Whatsapp मध्ये येणार एक जबरदस्त फीचर, जे सांगेल एक मेसेज किती वेळा झाला आहे फॉरवर्ड
WhatsApp Image (Photo Credits: PixaBay)

सोशल मिडिया लोकप्रियतेच्या बाबतीत सर्वात अव्वल स्थानावर असलेला अॅप म्हणजे 'व्हॉट्सअॅप' (WhatsApp). हे अॅप नेहमी आपल्या यूजर्सना काही ना काही तरी नवनवीन गोष्टी देण्याच्या प्रयत्नात असते. त्यातच भर म्हणून आता व्हॉट्सअॅप एक नवीन फीचर घेऊन येत आहे. या फीचरच्या साहाय्याने तुम्हाला एका मेसेजला किती वेळा फॉरवर्ड केले गेले आहे हे अगदी सहजपणे समजेल. या फीचरला मार्च 2019 मध्ये अॅनड्रॉईड बीटा 2.19.80 (Android Beta 2.19.80)मध्ये पाहिले गेले होते. आणि आता एका भारतीय ट्विटर यूजर ने या फीचर चे स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

खरे पाहता, अफवा बातम्यांवर लगाम लावण्यासाठी मागील वर्षी WhatsApp ने फॉरवर्डिंग लेबल सादर केले होते.

याच वर्षी मार्च महिन्यात WhatsApp ने Google वर अॅनड्रॉईड बीटा चे अपडेट सादर केले होते. यात दोन नवीन फीचर दिले गेले होते. पहिली फॉरवर्डिंग इन्फो (Forwarding Info)आणि दुसरा फ्रिक्वेंटली फॉरवर्डेड (Frequently Forwarded). आता ट्विटर यूजर ने @beingpunjabi द्वारा शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, व्हॉट्सअॅप चे फॉरवर्ड केलेल्या मेसेजमध्ये तीन विकल्प दाखवले जातात. Seen’, ‘Delivered’ आणि ‘Forwarded. या पर्यायांमुळे तुम्हाला अगदी सहजपणे कळेल की , एक मेसेज किती वेळा फॉरवर्ड केला गेला आहे.

हेही वाचा- Whatsapp मध्ये येणार एक जबरदस्त फीचर, जे सांगेल एक मेसेज किती वेळा झाला आहे फॉरवर्ड

हे माहिती करुन घेण्यासाठी यूजर्स ला मेसेज इंफो सेक्शनमध्ये जावे लागेल. यासाठी कोणत्याही पाठवलेल्या मेसेजला जोरात दाबावे लागेल. त्यानंतर WhatsApp चॅट विंडोवर आय (I) आयकॉन निवडावे लागेल. सध्या हे फीचर अॅनड्रॉईड बीटा चरणमध्ये आहे. तसेच या फीचरला आता पर्यंत गुगल प्ले अपडेटमध्ये रोल आऊट सुद्धा केले गेले नाही आहे.

याआधी Whatsapp बीटा अपडेटमध्ये त्या मेसेजेससाठी फ्रिक्वेंटली फॉरवर्डेड टॅग लागू केले गेले होते. ज्याला पाच वेळेपेक्षा जास्त पाठविले गेले होते.