रस्ते अपघातांमध्ये वेळेवर उपचार मिळण्याअभावी मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक आहे. सध्या 108 या क्रमांकावर गरजवंतांना अॅम्ब्युलन्स (Ambulance) उपलब्ध करुन दिली जाते. मात्र लवकरच एका अॅपच्या (App) मदतीने अचूक ठिकाणी आणि तत्परतेने अॅम्ब्युलन्स पोहचवण्यासाठी सोय खुली होणार आहे. याकरिता एक अॅप विकसित करण्याचे काम सुरू आहे. मागील वर्षी ऑफिसर्सना, संबंधित तरूणांना अपघातांग्रस्तांना मदतीसाठी अॅप डिझाईन करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून आवाहन करण्यात आलं होतं.
2015 वर्षाच्या एका IAS officer बॅचच्या अधिकार्याने गूगल (google) सोबत एकत्र येऊन एक खास अॅप बनवलं आहे. या अॅपच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त स्थळाची माहिती, रूग्णाची माहिती रिअल टाईममध्ये मिळणार आहे. यामुळे आता फोन करून अॅम्ब्युलन्स बोलावणं, अचूक ठिकाणी वेळेत पोहचणं हे सुकर होणार आहे. वेळेत अॅम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने मृत्यू होण्याचं प्रमाण गंभीर होतं. मात्र आता GPS मुळे ठिकाणाचाही अचुक वेध घेता येणार आहे.
2017 साली भारतामध्ये सुमारे 1 लाख 46 हजाराहून अधिक लोकं रस्स्ते अपघातामध्ये मृत्यूमुखी पडले होते. आता नव्या अॅप बाबतची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील रूचल्याने लवकरच हे अॅप उपलब्ध होणार आहे.