WhatsApp च्या माध्यमातून बँक खात्यामधील पैशांची चोरी होतेय, रहा सावध
WhatsApp | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

व्हॉट्सअॅपचे जवळजवळ देशभरातून 1.3 अरब युजर्स आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांत एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवता येतो. तर कंपनीकडून नव्या ट्रेन्डनुसार त्यामध्ये विविध फिचर्स आणले जातात. मात्र सध्या व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक वाईट बातमी असून कंपनीने सावधगिरीचा इशारा दिला आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून हॅकर्सकडून डेटा चोरी, ग्राहकांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यात अधिक भर पडली असून आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बँक खात्यामधील पैशांची चोरी केली जात आहे.

गेल्या महिन्यात एका युजर्सची व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही QR कोड वापरुन केली जात आहे. तर हॅकर्स खासकरुन ग्राहकांची फसणूक ही ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्यासाठी जाहीरात झळकवली आहे त्यांना जाळ्यात ओढतात. एवढेच नाही तर ग्राहकांना पैशांची लालसा दाखवत त्यासाठी बँक खात्याची माहिती मागितली जाते.(Weak Passwords of 2019: सावधान! तुम्ही 'हे' हॅक होणारे पार्सवर्ड वापरताय का?)

सध्या QR कोडच्या माध्यमातून पैशांचे पेमेंट केले जात आहे. मात्र हॅकर्सचा सुद्धा यावर डोळा असून ग्राहकांची फसवणूक करत आहे. तर क्यूआर कोड हा फक्त पेमेंट करण्यासाठी असून त्यामधून पैसे रिसिव्ह केले जात नाहीत. नेहमीच लक्षात ठेवा तुमच्या व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आलेला क्यूआर कोड हा तुमच्या खात्यामधील पैशांची चोरी होऊ शकते. फसवणूकदारांकडून पाठवण्यात आलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पिन क्रमांक द्यावा लागतो. त्यानंतर खात्यामधील पैसे काढले गेले जातात.