Johann Sebastian Bach Google Doodle: गुगलचे आजचे हार्मोनियमवाले डूडल पाहिले काय?
Johann Sebastian Bach Google Doodle | Photo Credits: Google)

Johann Sebastian Bach Google Doodle: इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणजे गुगल. याच गुगलचे दैनंदिन डुडल हा नेटीझन्सच्या आकर्षणाचा केंद्रबिदू असतो. आजचे (22 मार्च 2019) डुडलही असेच खास आहे. हे डुडल जगप्रसिद्ध संगितकार जोहान सेबेस्टियन बाक यांच्या 18 व्या शताब्दी निमित्त तयार करण्यात आले आहे. जोहान सबेस्टियन यांचा आज जन्मदिन आहे. याच दिवशी 1685मध्ये सेबेस्टिन यांचा जन्म झाला होता.

जोहान सबेस्टियन यांच्या जन्मशताब्दी निमित्त तयार गेलेल्या गुगल डुडल मध्ये बरेच काही विशेष आहे. गुगलने एक असा डूडल बनवले आहे ज्यात तुम्ही तुमची म्युजिकल नोटही लिहू शकता. ज्याचा उपयोग जोहान बाक यांच्या म्युजिकल शैलीशी साधर्म्य असणारी नोट तुम्ही बनविण्यासाठी करु शकता. इथे एक ईस्टर एगही आहे जे 80 च्या दशकातील शैलीला रॉक कंपोजिशनमध्ये बदलवते. गुगलने बाच यांच्या कंपोजिशनला 306 कॉम्प्यूटर मॉडेलमध्ये सादर केले आहे. आणि त्याला गुगल डूडलमध्ये ट्रन्सफरही केले आहे. (हेही वाचा, Happy Holi 2019 Google Doodle: रंगीबेरंगी डुडलसह गुगलचे होळी सेलिब्रेशन)

आजचे डूडल बनविण्यासाठी विशेष प्रोजेक्टसाठी डूडलने आपल्या खास टीमची मदत घेतली.