Google Wallet: गूगल वॉलेट घेणार Google Pay ची जागा, अँड्रॉईड युजर्स साठी रोल आऊट करण्यास सुरुवात
(Representative Image)

अमेरिकी टेक जायंट गूगल (Google ) ने Google I/O 2022 मध्ये केलेली Google Wallet बाबतची घोषणा आता प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली आहे. Google Wallet हे Google Pay या अॅपला रिप्लेस करणार आहे. सध्यास्थितीत Google Wallet आणि Google Pay हे अमेरिका, सिंगापूर आदी देशांमध्ये सोबत काम करतील. गूगलने त्या दृष्टीने Wallet ऐप रोल आऊट करण्यास सुरुवात केली आहे. हे नवे अॅप गूगल पे सोबत अपडेट रोल आऊट केले जात आहे. आजघडीला 39 देशांमध्ये निवडक Android यूजर्ससाठी हे अॅप रोल आऊट केले जात आहे. आगामी काळात या सर्व यूजर्सना हे अॅप रोल आऊट केले जाईल.

Google Wallet बाबत The Verge ने दिलेल्या वृत्तानुसार पुढच्या काहीच काळात जगभरातील सर्व देशांमध्ये हे नवे अॅप रोल आऊट केले जाईल. गूगल प्रवक्तांनी म्हटल आहे की, जगभरातील 39 देशांतील युजर्ससाठी हे अॅप रोल आऊट केले जाईल. लवकरच Google Wallet हे Android यूजर्साठीही रोल आऊट करण्यात येईल.

Google Wallet बाबत Google I/O 202 मध्येच सांगण्यात आले होते की, हे अॅप यूजरचे सर्व डिजिटल कार्ड मॅनेज करेल. ज्यात डेबिट आणि क्रेडिट कार्ड वगळता, आयडेंटिटि कार्ड, वॅक्सीनेशन स्टेटस, तिकीट आणि सुरक्षीतता अशा विविध गोष्टी पाहायला मिळतील. (हेही वाचा, काय सांगता? iPhone 11 Pro ची कमाल; रशियन बुलेटपासून केले युक्रेनियन सैनिकाचे रक्षण, जाणून घ्या सविस्तर (Watch Video))

9to5Google ने दिलेल्या एका वृत्तानुसार, सिंगापूर आणि अमेरिकेत Google Pay केवळ UPI अॅपप्रमाणे काम करेल. तर Google Wallet मध्ये सर्व डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यात येईल. या अॅपच्या सेटिंग्जमध्ये मेन्यू ते Gmail अकाउंट सोबत इतर सर्व फिचरही जोडली जाऊ शकतात.

दरम्यान, 2011 मध्येही Google Wallet NFC पेमेंट ऐप म्हणून लॉन्च करण्यात आले होते. यात पीर-टू-पीर मनी ट्रांसफर यांसारखी फीचर्स समाविष्ठ करण्यात आली होती. 2018 मध्ये गूगलने याला Android Pay मर्ज करुन Google Pay असे नाव दिले होते. तर भारतात Google Tez अॅपला रिब्रँड करुन Google Pay असे करण्यात आले होते. आता गूगल पुन्हा एकदा त्याला Google Wallet नावाने रीब्रांड करत आहे. ज्यामुळे युजर्सला अधिक फिचर्स मिळतील.