Google Pixel 3 | (Photo Credits: IANS)

गुगल (Google) आपल्या युजर्सचा अनुभव उत्तम बनवण्यासाठी नवे नवे फिचर्स रोलाऊट करत असतो. अशातच आता कंपनीने पिक्सल स्मार्टफोनच्या गुगल फिट अॅपमध्ये नवे हार्ट रेट (Heart Rate) आणि रेस्पिरेटरी मॉनिटर देण्याची घोषणा केली आहे. हे फिचर या महिन्याच्या अखेरीस सर्व युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पण कोणत्या तारखेला ते रोलाउट केले जाईल याबद्दल कंपनीने स्पष्ट केलेले नाही.(YONO Super Saving Days: SBI ग्राहकांना योनोद्वारे पेमेंट केल्यास मिळेल 50 टक्के सूट; जाणून घ्या कोणासाठी आहे ही खास ऑफर)

खासियत म्हणजे गुगल पिक्सल डिवाइस मध्ये येणारे हे दोन्ही फिचर स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याच्या मदतीने काम करणार आहेत. युजर्सला हार्ट रेट मॉनिटर करण्यासाठी हे फिंगरटिप्स मध्ये होणाऱ्या रक्ताच्या रंगात होणारा बदल ट्रॅक करणार आहे. दुसऱ्या बाजूला रेस्पिरेटरी मॉनिटर युदर्सच्या छातीचे राइज अॅन्ड फॉल ट्रॅक करणार आहे.(Union Budget 2021: डिजिटल व्यवहारांवर मिळणार मोठी सवलत; केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारची महत्त्वाची घोषणा)

कंपनीच्या एका हेल्थ प्रॉडक्ट मॅनेजरने सांगितले की, डॉक्टरांकडून कोणत्याही रुग्णाचे रेस्पिरेटरी रेट हा श्वास घेताना छाती वर खाली होते त्यावरुन ते ट्रॅक करतात. त्यासोबत कंपनीने हे सुद्धा म्हटले आहे की, हे फिचर रोलआउट केल्यानंतर युजर्सला आपल्या एकूणच आरोग्याला ट्रॅक करता येईल. गुगल पिक्सलच्या फोनसाठी आलेले हे हार्ट रेट मॉनिटर हे सॅमसंग गॅलेक्सी S10 सारख्या डिवाइसमध्ये मिळणाऱ्या फिचर प्रमाणेच काम करणार आहे. दरम्यान, सॅमसंगने हे फिचर गॅलेक्सी S10e, Galaxy S20 सीरिज आणि त्यानंतर लॉन्च झालेल्या स्मार्टफोनसाठी हटवण्यात आले आहे.