गुगल प्ले स्टोरवर सध्या उपलब्ध असलेल्या काही धोकादायक अॅपची पुष्टी करण्यात आली आहे. हे अॅप जोकर व्हायरस संदर्भातील असून ते तुम्हाला मोठे नुकसान पोहचवू शकतात. सायबर सिक्युरिटी रिसर्जर Zscaler च्या ThreatLabz च्या रिपोर्टमध्ये मंगळवारी असे सांगण्यात आले आहे की, नुकत्याच एकूण 11 अॅपची पुष्टी करण्यात आली आहे. जे बँकिंग फ्रॉडच्या घटनांसाठी जबाबदार आहेत. हे अॅप आतापर्यंत 30 हजारांहून अधिक वेळा इंस्टॉल करण्यात ले आहेत. जर तुमच्या सुद्धा मोबाईल फोनमध्ये हे अॅप्स असतील तर ते तातडीने अनस्टॉल करा.
Zdnet.com च्या रिपोर्ट्सनुसार जोकर मावेअर फॅमिली एक फेमस वेरियंट आहे. जो खासकरुन अॅन्ड्रॉइड डिवाइसवर हल्ला करण्यासाठी तयार केला जातो. जोकर मालवेअरची जासूसी करणे, मेसेज आणि SMS च्या माध्यमातून माहिती चोरी करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. जोकर मालवेअरच्या माध्यमातून बँकिंग फ्रॉड केले जातात. त्याचसोबत जोकर अॅन्ड्रॉइड अलर्ट सिस्टिमच्या सहाय्याने सर्व नोटिफिकेशनचे परमिशन मिळवले जातात. ट्रांसलेट फ्री, पीडीएप कंन्वर्टर स्कॅनर, Delux च्या बोर्डच्या माध्यमातून जोकर मालवेअर फोनमध्ये येतो.
तर पुढील अॅप तातडीने तुमच्या फोनमधून डिलिट करा- Free Affluent Message, PDF Photo Scanner,delux Keyboard,Comply QR Scanner,PDF Converter Scanner, Font Style Keyboard,Translate Free,Saying Message,Private Message,Read Scanner,Print Scanner
दरम्यान, गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये जवळजवळ 50 जोकर मालवेअरची पुष्टी करण्यात आली आहे. यामध्ये युटिलिटी, हेल्थ सारख्या कॅटेगरीचा समावेश आहे. यामध्ये टूल्स कॅटगरी आधारित 41.2 टक्के डिवाइसवर सर्वाधिक जोकर आधारित मालवेअरचा हल्ला झाला आहे. तर खासगी डिवाइसवर 21.9 टक्के हल्ला झाला आहे. तर कम्युनिकेशन डिवाइसवर 27.5 टक्के, फोटोग्राफिक डिवाइसवर 7.8 टक्के आणि हेल्थ-फिटनेवर सर्वात कमी 2 टक्के सायबर हल्ले झाले आहेत.