Google Pay मध्ये आले बिल्स स्पिलट फिचर, जाणून घ्या कसे करते काम
Google Pay (Photo Credits-Twitter)

गुगल पे (Google Pay) युजर्ससाठी महत्वाची बातमी आहे. कारण कंपनीने बिल्स स्पिलट नावाचे एक फिचर रोलआउट केले आहे. या फिचरची दीर्घकाळापासून वाट पाहिली जात होती. बिल्स स्पिलट फिचर बद्दल गेल्याच महिन्यात Google For India मध्ये घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता ते फिचर अखेर लॉन्च करण्यात आले आहे. युजर्सला गुगल प्ले स्टोर किंवा अॅप्पल अॅप स्टोरच्या माध्यमातून गुगल पे अॅप अपडेट केल्यानंतर हे नवे फिचर वापरता येणार आहे. तर जाणून घ्या या बद्दल अधिक माहिती.

गुगल पे हे फिचर ग्रुप पेमेंट (Group Payment) प्रमाणे काम करते. यामध्ये एकाच वेळी काही लोकांना पैसे ट्रान्सफर करता येतात. तर हे फिचर नेमके कसे काम करते त्याबद्दल येथे जाणून घ्या अधिक.(Department Of Telecommunication: दूरसंचार कंपन्यांना आता 2 वर्षांसाठी ठेवावे लागणार कॉल डिटेल्स, सुरक्षेसाठी नियमात बदल)

-सर्वात प्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये Google Pay सुरु करा

-आता New Payment बटणावर क्लिक करा

-त्यानंतर एक नवे पेज सुरु होत तेथेच वरती Search Bar आणि खालील बाजूस New Group असे ऑप्शन दिसेल

-आता तुम्ही क्लिक करा. तुमचे नाव आणि मित्रांची नावे सुद्धा त्यामध्ये अॅड करा. असे केल्यानंतर तुम्हाला Next Button वर क्लिक करावे लागेल

-आता ग्रुपला नाव दिल्यानंतर तो Create करा

-या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही स्पिलट बिल फिचरा वापर करत पेमेंट करु शकता

-ग्रुप तयार केल्यानंतर तुम्हाला Split An Expenses बटणावर क्लिक करावे लागणार आहे

-आता गुगल तुमची अमाउंट स्पिलट करणार आहे. त्याचसोबत किती पैसे खर्च केले हे सुद्धा दाखवले जाईल.

-आता तुम्हाला Send Request वर क्लिक करावे लागेल

तर वरील काही सोप्प्या स्टेप्स वापरुन तुम्ही गुगल पेमेंटच्या माध्यमातून हे नवे फिचर वापरु शकतात. त्याचसोबत हे फिचर तुम्ही घरातील मंडळींसोबत ही शेअर करु शकता. जेणेकरुन पेमेंट करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल.