गुगल पेमेंट अॅप गुगल पे त्यांना ग्राहकांना पैसे जिंकण्याची संधी देत आहे. यावेळी गुगल पे अॅपवर 2020 Stamps नावाची ऑफर आणली आहे. त्यामुळे युजर्सला अॅपच्या माध्यमातून स्टॅम्प्स एकत्र करावे लागणार आहेत. त्यानुसार युजर्सला 2020 रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. गुगल पे वर दिवाळीच्या वेळेस सुद्धा याच प्रकारची ऑफर सुरु करण्यात आली होती. त्यावेळी ऑफर नुसार 251 रुपये देण्यात आले होते. गुगल पे वर ही ऑफर 23 डिसेंबर पासून सुरु झाली आहे.
गुगल पे वरुन पैसे जिंकण्यासाठी युजर्सला Rewards ऑप्शन मध्ये जावे लागणार आहे. त्यानंतर तेथे गेल्यावर पुगा, डिजे, चष्मा, डिस्को, टॉफी, सेल्फी किंवा पिझ्झा सारखे स्टॅम्प दाखवले जातील. हे स्टॅम्प तीन लेअर मध्ये देण्यात आले असून एक पूर्ण केक तयार करावा लागणार आहे. यामध्ये एकूण 7 स्टॅम्प आहेत. ते पूर्ण केल्यानंतर युजर्सला 2020 रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्याचसोबत केकची प्रत्येक एक लेअर पूर्ण केल्यावर सुद्धा बोनस दिला जाणार आहे.
>>Stamps कसे कलेक्ट कराल?
स्टॅम्प मिळवण्यासाठी यामध्ये विविध ऑप्शन दिले जाणार आहेत. प्रत्येक एक ऑप्शन नुसार एका दिवसात 5 स्टॅम्प मिळवू शकतात. तर खाली दिलेल्या स्टेप्स नुसार तुम्ही स्टॅम्प जमा करु शकता.
-कोणत्याही बिझनेस किंवा गुगल पे युजर्सला 98 किंवा त्यापेक्षा अधिक पैसे पाठवा
-कमीत कमी 300 रुपयांचे बिल भरणे किंवा 98 रुपयांचा मोबाईल रिचार्ज करणे
-मित्रांना गुगल पे साठी इनव्हिटेशन पाठवल्यानंतर पहिल्या वेळेस पेमेंट करणे
-2020 लिहिला क्रमांक स्कॅन केल्यावर
-टीव्ही किंवा युट्यूबवर जाहिराती ऐकल्यावर(Google कडून अलर्ट! Chrome ब्राउजरवर लीक झाले युजर्सचे पासवर्ड)