Google चा नवा Nest Audio स्मार्ट स्पीकर खास फिचर्ससह भारतात लॉन्च, 8 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा
Google nest audio (Photo Credits- Twitter)

टेक कंपनी गुगलने Google Pixel 4a व्यतिरिक्त त्यांचा नवा स्मार्ट स्पीकर Nest Audio भारतात लॉन्च केला आहे. या स्पीकरची विक्रीसाठी ई-कॉमर्स साइट Flipkart चा बिग बिलियन डे स्पेशल सेल मध्ये उपलब्ध करुन दिला आहे. या सेलची सुरुवात 16 ऑक्टोंबर पासुन होणार आहे. मुख्य फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास युजर्सला गुगलच्या नव्या नेस्ट ऑडिओ स्मार्ट स्पीकरमध्ये 19mm चे ट्वीटर आणि 75mm चे मिड-वुफर मिळणार आहे. जे शानदार साउंड प्रोड्युस करणार आहेत. कंपनीने गुगल नेस्ट ऑडिओ स्मार्ट स्पीकरची किंमत 7999 रुपये ठेवली आहे दरम्यान ग्राहकांना हा स्पीकर फ्लिपकार्टवर सुरु होणाऱ्या सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये याची किंमत 6999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर स्पीकर भारतीय बाजारात Chalk आणि Charcoal कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने गुगल नेस्ट ऑडिओ मध्ये 75mm चा वुफर, 19mm चा ट्वीटर, 3 फार फिल्ड मायक्रोफोन, 2 स्टेज माइक म्युट स्विच आणि क्वाड कोर ARM Cortex-A53 प्रोसेसर दिला आहे. त्याचसोबत या स्मार्ट स्पीकरमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटुथ वर्जन 5.0 आणि वायफाय सुविधा दिली आहे. या व्यतिरिक्त या स्पीकरला टच कंट्रोल आणि बिल्ट इन क्रोमकास्ट सपोर्ट मिळणार आहे.(Flipkart Big Billion Days Sale 2020: बिग बिलियन डे सेल पूर्वीच ग्राहकांना अवघ्या एक रूपयामध्ये वस्तू Pre-Book करता येणार; इथे जाणून घ्या या धमाकेदार ऑफर्स बद्दल!)

कंपनीने असा दावा केला आहे की, स्पीकर गुगल होमच्या तुलनेत 75 टक्के Louder आहे. तसेच 50 टक्के अधिक मजबूत बास प्रोड्युस करणार आहे. या स्पीकरमध्ये Media EQ फिचर दिला आहे. जो स्वयंचलित रुपात कंन्टेंटच्या आधारावर ऑडिओ कमीजास्त करतो. तर Ambient IQ जवळील आवाजाच्या नुसार वॉल्यूम कंट्रोल करतो. तसेच यामध्ये मल्टी-रुम कंट्रोल सारखे फिचर्स दिले गेले आहेत.(Amazon Wow Salary Days Sale: लॅपटॉप, टीव्ही, फ्रिज, एसी यांसह 'या' वस्तूंवर भरगोस सूट; पहा ऑफर्स)

तर गुगलने गेल्या वर्षात Google Nest Mini भारतात लॉन्च केला होता. गुगल नेस्ट मिनीचे डिझाइन हे Home Mini सारखेच आहे. यामध्ये राउंड शेपच्या या डिवाइसमध्ये वॉल-माउंटिंगसाठी हूक, पॉवर कनेक्टर पोर्ट आणि केबल दिली गेली आहे. तसेच डिझाइनच्या खालील बाजूल मायक्रोफोन स्लाइडर स्विच आणि लाइट सुद्धा आहे. गुगल मिनी नेस्ट मध्ये वापरण्यात आलेली मशीन लर्निंग चिपच्या मदतीने युजर्सला शानदार साउंड क्वालिटी आणि उत्तर परफॉर्मेंसची सुविधा मिळणार आहे. तसेच हे डिवाइस ई-मेल वाचणे किंवा ट्राफिक डिटेल्स सांगण्यासह अन्य कामे सुद्धा करु शकतो.