Google Meet (Photo Credits-Twitter)

अमेरिकन टेक्नोलॉजी कंपनी गूगल (Google) ने आपल्या व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप गूगल मीट (Google Meet) मध्ये टाईम लीमिट लावली आहे. आता गूगल मीट वर यूजर्स केवळ 60 मिनिटं ग्रुप व्हिडिओ कॉल (Group Video Call) होस्ट करू शकणार आहेत. हे वेळेचं बंधन आता केवळ त्याच युजर्ससाठी असेल जे गूगल मीट मोफत वापरत आहेत. गूगल कडून मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या पॉलिसीनुसार, जून 2021 पर्यंत व्हिडीओ कॉल च्या वेळेवर कोणतेही बंधन नसेल.

गूगलच्या माहितीनुसार, गूगल मीट 60 मिनिटांसाठी आता किमान 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त युजर्सच्या व्हिडीओ कॉल साठी मोफत उपलब्ध असेल. 55 मिनिटापासून सार्‍या युजर्सना तुमचा कॉल आता संपणार आहे याचं नोटिफिकेशन मिळण्यास सुरूवात होणार आहे. 60 व्या मिनिटाला ग्रुप व्हिडीओ कॉल बंद होईल. दरम्यान वेळेचं बंधन ग्रुप कॉल साठी असेल. गूगल मीट वर वन ऑन वन कॉल मात्र पहिल्याप्रमाणेच मोफत राहणार आहे. त्यावर कोणतेही टाईम लिमिट नसेल. युजर्स 24 तास वन ऑन वन कॉल करू शकतात. (नक्की वाचा: Google Photos Unlimited Free Storage आज 1जूनपासून संपलं; पहा आता त्याला पर्यायी उत्तम Cloud Storage Plans कोणते?).

परदेशात अपग्रेड पॅकेज

गूगलने ग्रुप व्हिडीओ कॉल 60 मिनिटांच्या पुढे चालू ठेवण्यासाठी खास अपग्रेड पॅकेज देखील काही ठिकाणी जाहीर केले आहे. अमेरिका, कॅनडा, मॅक्सिको, ब्राझील आणि जपान मध्ये 60 मिनिटांच्या पुढे ग्रुप कॉल सुरू ठेवायचा असेल तर 7 डॉलर मोजावे लागणार आहेत. हा पॅक घेतल्यानंतर गूगल मीट वर 24 तास ग्रुप व्हिडिओ कॉल करता येणार आहे.