नवी दिल्ली: ट्रेन किंवा बसने प्रवास करायचा झाला तर पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे गर्दी किती असेल? मग चढायला जागा मिळेल का? ट्रेनमध्ये सीट रिकामी असेल का? पण आता या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रवासाच्या आधीच मिळवता येणार आहेत, गुगल मॅप्स (Google Maps) ने लाँच केलेल्या एका नव्या फीचरमुळे आता तुम्ही ऍप वरून प्रवासाचा रूट आणि वाहनासोबतच ट्रेनच्या वेळा आणि गर्दीचा सुद्धा अंदाज घेऊ शकणार आहात. त्यामुळं ट्रेन आणि बसमधून दररोज प्रवास करणाऱ्यांचा काही प्रमाणात त्रास कमी होणार आहे. Google Maps चे नवे फिचर; आता कळणार बस, ट्रेनचे लाईव्ह रनिंग स्टेटस
Google Maps ट्विट
Me during my commute: MOVE. THAT. BUS.
Now you can see real-time delays and how crowded your bus is on your way to work 🙌
Read more here: https://t.co/mMrQY3ji5u pic.twitter.com/afAK2Bz5KB
— Google Maps (@googlemaps) June 27, 2019
गुगल मॅप्सचं हे नवीन फीचर अॅंड्रॉइड आणि आयओएस यूजर्सना ट्रेनचं वेळापत्रक आणि गर्दीची माहिती पुरवणार आहे.यामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे, काहीच जागा रिकामी आहेत, उभं राहण्याची जागा आहे, जागा नाहीये अशा चार पर्यायात उत्तर मिळेल. यांचा अंदाज घेऊन मग प्रवासी आपली यात्रा प्लॅन करू शकतात. यामधून बस आणि ट्रेनच्या वेळांच्या माहिती सोबतच नव्या अपडेटसह आता रिक्षांच्या उपलब्धतेबाबतही माहिती दिली जात आहे. हे फीचर साध्य जगातील 200 प्रमुख शहरांमध्ये सुरु करण्यात आले आहे. संपूर्ण माहिती मिळताच याचा आणखी प्रसार करण्यात येणार आहे. Google Maps चे नवे फिचर; प्रवासादरम्यान गाडी चुकीच्या रस्त्याने गेल्यास मिळेल Off Route Alter
गुगल मॅप्सनं बस वाहतुकीसाठी 'लाइव्ह ट्रॅफिक डीले' हे नवीन फीचर आणलं आहे. ते इस्तंबूल, मनिला, जागरेब आणि अटलांटासारख्या जगातील प्रमुख शहरांत उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या फीचरच्या अचूक माहितीचा लाभ 6 कोटी यूजर्सना होत आहे. हे फीचर सर्वात आधी भारतात लाँच करण्यात आलं आहे, असं गुगलचे रिसर्च सायंटिस्ट एलेक्स फॅब्रिकँट यांनी सांगितलं.