पुलवामा (Pulwama) येथील भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानवर (Pakistan) सर्व स्तरांतून टीकेची झोड उठवली जात आहे. तसेच पाकड्यांना प्रतिउत्तर भारताकडून मिळेल अशी मागणी भारतीय जनता करत आहे. त्यांनतर काही दिवसांपूर्वी गुगलवर (Google) सर्च केल्यावर 'जगातील बेस्ट टॉयलेट पेपर' (Best Toilet Paper In The World) म्हणून पाकिस्तानचा झेंडा नेटकऱ्यांना दाखवला जात होता. मात्र आता खुद्द गुगलने याबाबत आपली प्रतिक्रिया मांडली आहे.
गुगलच्या सुत्रानुसार, सोशल मीडियावर पाकिस्तानचा झेंडा टॉयलेट पेपर म्हणून दाखवत असल्याचा कोणताही पुरावा आम्हाला आढळून आला नसल्याचे स्पष्ट केले आहे.तसेच पाकिस्तानचा झेंडा हा काही विशिष्ट गोष्ट गुगलवर सर्च केल्यावर दिसतो असे ही सांगण्यात आले आहे.(हेही वाचा-'Best Toilet paper in the World' म्हणजे पाकिस्तानचा झेंडा, Google वर सर्च करुन पाहा)
बऱ्याच वृत्तपत्रांनी आणि संकेतस्थळांनी गुगल वरील पाकिस्तानचा झेंडा जगातील बेस्ट टॉयलेट पेपर असल्याची बातमी झळकावली आहे. मात्र 2017 मधील काही मेम्सचे स्क्रिन शॉट काढून ते पोस्ट केल्याचे गुगलने म्हटले आहे. त्याचसोबत आम्हीसुद्धा पाकिस्ताबद्दल ही गोष्ट सर्च करुन पाहिल्यास असे सर्च केल्यावर दिसले नसल्याचे ही गुगलने सांगितले आहे.