iphone (Photo Credits: File Photo)

तुम्ही नवा आयफोन (iPhone) खरेदी करण्याचा विचार करत आहात? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महत्वाचे म्हणजे, आयफोन खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. लवकरत आयफोन कंपनीचा बजेट स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहे. मिळालेल्या माहतीनुसार, आयोफोन कंपनी आयफोन एसई 3 (iPhone SE 3) वर काम करीत आहे. विशेष म्हणजे, कमी बजेस असणाऱ्यांसाठी या स्मार्टफोनची निर्मिती केली जाणार आहे. हा स्मार्टफोन 2022 च्या सुरुवातीस बाजारात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अहवालानुसार, आयफोन एसई 3 ची किंमत 499 डॉलरपासून (सुमारे 36,400 रुपये) सुरू होण्याची शक्यता आहे. आयफोन एसई प्लसच्या प्लस व्हर्जनवरही कंपनी काम करीत आहे. भारतात आयफोन एसई 3 ची किंमत 40,000 रुपयांच्या खाली असू शकते. आयफोन एसई 2021/2022 असेल, जो आयफोन एसई (2020) आणि मूळ आयफोन एसई मध्येच काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात येणार आहे. हे देखील वाचा- Realme चा स्वस्त स्मार्टफोन C11 2021 लॉन्च; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स

आयफोन एसई 3 मध्ये 5.4 इंचाचा एलसीडी पॅनेल सुचविला आहे. मागील कॅमेरा सेन्सर आयफोन 12 मिनी प्रमाणेच एफ/ 1.6 लेन्ससह 12 मेगापिक्सल रिझोल्यूशन सेन्सर असण्याची अपेक्षा आहे. आयफोन एसई 3 अॅप्पल ए 14 बायोनिक एसओद्वारे 4 जीबी रॅम आणि 4 जी कनेक्टिव्हिटीसह समर्थित असेल. हा स्मार्टफोनमध्ये 64 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज पर्याय उपलब्ध असतील, असे सांगण्यात आले आहे.