Gmail Down झाल्याने जगभरातील युजर्सची अडचण, इमेल्स पाठवताना अडथळा; भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह 42 देशांतून तक्रारी
Gmail | (File Photo)

जीमेल डाऊन (Gmail Goes Down) झाल्याने भारतासह जगभरातील जीमेल युजर्सन (Gmail Users) फटका बसला आहे. युजर्सना ईमेल (Email ) पाठविण्यास अडचण निर्माण होत आहे. जगभरातील जीमेल युजर्स दावा करत आहेत की, त्यांना जीमेल सेवा वापरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ईमेल पाठवणे, फाईल अॅटेच करणे इतकेच नव्हे तर गुगल ड्राईव्ह वापरतानाही समस्यांचा सामना करावा लागतो आहे. काही युजर्स सांगत आहेत की, ईमेल्सवरुन फाईल डाऊनलोड करतानाही त्रुटींचा सामना करावा लागतो आहे.

डाऊन डिटेक्टर ( Down Detector) च्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आज सकळी 11 वाजलेपासून आउटेजला (Outage) सुरुवात झाली. ट्रॅकींग वेबसाईटने म्हटले आहे की, प्रामुख्याने फाईल अॅटेच करताना अनेक युजर्सना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तर, काही युजर्सनी दावा केला आहे की त्यांना जीमेल लॉग ईन करतानाच समस्यांचा सामना करावा लागतो आहे. जी मेल लॉग इन (Gmail Log-In) होत नाही आणि संदेशही प्राप्त होत नाही. जीमेल डाऊन झाल्याने प्रामुख्याने भारत, अमेरिका, युरोपमधी काही देशांतील युजर्सना समस्येला सामोरे जावे लागत आहे. (हेही वाचा, Facebook ने आणले TikTok सारखे Short Video फिचर, भारतात टेस्टिंग सुरु असल्याची माहिती)

आउटेज रिपोर्टमध्येही जीमेलबाबत असाच स्पाईक (Spike ) दाखवत आहे. ट्रॅकींग वेबसाईटने म्हटले आहे की अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, फिलीपिन्स, न्यूझीलंड आणि इतर 42 देशांमधील युजर्सनी जीमेलवर समस्या उद्भवल्याची तक्रार केली आहे.