Facebook ने आणले TikTok सारखे Short Video फिचर, भारतात टेस्टिंग सुरु असल्याची माहिती
फेसबुक (Photo Credits: ANI)

भारतात टिकटॉकवर (TikTok) बंदी आणि अमेरिकेने सुद्धा ते बॅन करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर फेसबुककडून (Facebook) त्यांच्या अॅपमध्येच नवे एक Short Videos फिचरचे टेस्टिंग सुरु केले आहे. हे नवे फिचर News Feed च्या मधोमध दिसून येणार आहे. जे स्वाइप-अप-मॅनेजर मध्ये अत्यंत प्रसिद्ध असणाऱ्या टिकटॉक सारखेच काम करणार आहे. नुकताच फेसबुकने त्यांच्या इन्टाग्राम प्लॅटफॉर्मवर टिकटॉकची कमतरता पूर्ण करण्यासाठी Reels फिचर युजर्ससाठी लॉन्च केले आहे. त्यानंतर अशाच पद्धतीचे फिचर फेसबुकसाठी सुद्धा उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या फिचरच्या टेस्टिंग स्कोप बद्दल अद्याप निश्चिती नसून अॅन्ड्रॉइडच्या लेटेस्ट वर्जनसाठी हे उपलब्ध होऊ शकते.

सोशल मीडिया गुरु Matt Navarra ने ट्वीट करत सर्वात प्रथम ही माहिती दिली आहे. त्याने असे म्हटले आहे की, सोशल मीडिया कंपनी त्यांच्या फेसबुक अॅपमध्ये एक नवे Short Videos फिचरचे टेस्टिंग करत आहे. हे नवे फिचर टिकटॉक अॅपसारखे असून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाइप-अप-स्क्रॉल सारख्या गोष्टींचा समावेश आहे. हे फिचर फेसबुक अॅपसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. परंतु प्रत्येक भारतीय युजर्सला हे फिचर मिळण्याची शक्यता कमी आहे. फेसबुक हे फिचर कमर्शिअली रोलआउट करण्यापूर्वी युजर्समध्ये याची टेस्टिंग करत आहे.(WhatsApp वर लवकरच येणार 'हे' दमदार फिचर, चॅटिंग करण्याचा अंदाज पूर्णपणे बदलणार) 

फेसबुकच्या शॉर्ट व्हिडिओचे इंटरफेस हे टिकटॉक सारखेच आहे. त्यामध्ये डाव्या बाजूला कमेंट्स आणि लाईक्सचे ऑप्शन दिले आहे. तर क्रिएट ऑप्शन हे वरील बाजूस असून पहिल्या वेळेस क्लिक केल्यास नव्या फेसबुक कॅमेऱ्यासह डिस्क्रिप्शन लिहिलेले दिसून येते. नव्या शॉर्ट व्हिडिओ फिचर मध्ये युजर्सला त्यांनी तयार केलेल्या व्हिडिओ मध्ये म्युझिक सुद्धा अॅड करु शकता येणार आहे. व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर ती युजर्सला फेसबुकच्या Short Videos सेक्शन मध्ये पाहता येणार आहे.