Gmail Crashing: Android स्मार्टफोनमध्ये गूगलचं इमेल अ‍ॅप डाऊन; अनेकांना इमेल्स पाहणं कठीण
Gmail | Representational Image | (Photo Credits: Twitter)

गूगलच्या Android OS Apps सोबत असलेल्या युट्युब, जिमेल आणि अन्य सेवा आज सकाळपासून विस्कळित असल्याचं सांगितलं जात आहे. अनेकांनी त्याबद्दल विचारणा केली आहे. दरम्यान सर्व्हर डाऊन आहे की अ‍ॅप रिस्पॉन्स देत नाही असा अनेकांना प्रश्न पडला आहे. सध्या हा त्रास केवळ Android smartphones वापरत असलेल्यांना जाणवत आहे. आणि हे का होत आहे याचं कारण समजू शकलेले नाही. गूगल कडूनही  दखल घेण्यात आली आहे. अनेकांनी ट्वीट करत आपल्या या समस्येबाबत चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. काहींच्या मोबाईल मध्ये केवळ गूगलच्या सेवां तर काहींनी अमेझॉन, याहू मेल्स सारखी अ‍ॅप्स देखील क्रॅश होत असल्याची माहिती दिली आहे.  WhatsApp And Instagram Down: व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम ठप्प.

Google's Workspace Cloud Status Dashboard च्या माहितीनुसार, त्यांची टीम यामागील कारण शोधत आहे. त्यामध्ये युजर्स जीमेल मोबाईलमध्ये अ‍ॅप मध्ये पाहू शकत नसल्याचं म्हटलं आहे. पण डेस्टटॉप वर  Gmail Web वर मेल पाहता येत आहे. 9.30 च्या सुमारास पुढील अपडेट्स मिळतील असे देखील सुचवण्यात आले आहे.

 

19  मार्चलाच इंटरनेट युजर्संनी व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामच्या सेवेमध्ये झालेल्या गोंधळाबद्दल ट्विटरवर अशाच तक्रारी दाखल केल्या आहेत. अॅनरॉईड आणि आयओएस अॅपवरील 1.5 बिलियनपेक्षा अधिक युजर्स आपल्या अॅपमध्ये लॉनइन करु शकत नव्हते.