Samsung Galaxy S10 (Photo Credits: Twitter)

सॅमसंगने (Samsung) गॅलेक्सी एस 10 सिरीजमध्ये तीन नवे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. या सिरीजमध्ये कंपनीने तीन मॉडल्स सादर केले आहेत- गॅलक्सी एस 10 प्लस (Galaxy S10+), गॅलेक्सी एस 10 (Galaxy S10) आणि गॅलेक्सी एस 10 ई (Galaxy S10e). या तिन्ही स्मार्टफोन्सचे फिचर्स जबरदस्त असले तरी याच्या किंमतीत तफावत आहे. एमोलेड डिस्प्ले, दमदार प्रोसेसर, फास्ट वायरलेस चार्जिंग 2.0 यांसारखे फिचर्स यात देण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्स सोबतच सॅमसंगने फोल्डेबल सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड हा फोन देखील लॉन्च करण्यात आला. Samsung कंपनी लवकरच लॉन्च करणार ट्रिपल कॅमेरा असणारा स्मार्टफोन

सॅमसंगने गॅलेक्सी एस 10 आणि गॅलेक्सी एस 10 प्लसमध्ये अल्ट्रासोनिक इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये इनफिनिटी ओ-डिस्प्ले देण्यात आला आहे. गॅलेक्सी एस 10 ई स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर नसून यात साईड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

Galaxy S10, Galaxy S10+, Galaxy S10e चे फिचर्स:

गॅलेक्सी एस 10 प्लस मध्ये सॅमसंगने 6.4 इंचाची एमोलेड स्क्रीन दिली आहे. तर एस 10 मध्ये 6.1 इंच आणि एस 10 ई मध्ये 5.8 इंचाची एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. तिन्हीही स्मार्टफोनमध्ये कंपनीने ऑक्टाकोर Exynos 9820 प्रोसेसर दिला आहे. गॅलेक्सी एस 10 प्लस मध्ये 8 जीबी आणि 12 जीबी रॅम वेरिएंट मिळेल. तर एस 10 8 जीबी रॅममध्ये उपलब्ध असून एस 10 ई मध्ये 6 जीबी आणि 8 जीबी रॅम वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

गॅलेक्सी एस 10 प्लसमध्ये कंपनीने ट्रिप्ल रिअल कॅमेरा लेन्स दिली आहे. तर एस 10 आणि गॅलेक्सी एस 10 ई मध्ये डुअल लेन्स कॅमेरा दिला आहे. फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी फार महत्त्वाचे गॅलेक्सी एस 10 प्लस- 10 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सल असा ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. तर एस 10 आणि गॅलेक्सी एस 10 ई मध्ये 10 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.

Galaxy S10, Galaxy S10+, Galaxy S10e च्या किंमती:

सॅमसंग गॅलेक्सी एस 10 ची किंमत 899.99 डॉलर म्हणजे 63,900 रुपये आहे. तर गॅलेक्सी एस 10 प्लसची सुरुवातीची किंमत 999.99 डॉलर म्हणजे सुमारे 71,000 रुपये आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस 10 ई ची सुरुवातची किंमत 749.99 डॉलर म्हणजे सुमारे 53,300 रुपये आहे.