स्टेटस सिम्बॉल म्हणून ओळखल्या जाणा-या आयफोनमध्ये (iPhone) नेहमीच काही ना काही आधुनिक बदल होत असतात. आपल्या युजर्सला उत्कृष्ट सेवा देण्यासाठी हे नेहमी अॅप्पल(Apple) ही कंपनी तत्पर असते. असचं काहीसे ऐकायला मिळतय आयफोनच्या ह्या वर्षी येणा-या नवीन मॉडलविषयी. आयफोनच्या यंदाच्या मॉडलमध्ये फुल स्क्रीन टच आयडीसह बरेचसे बदल पाहायला मिळू शकतात असे सांगण्यात येतय. मिडिया रिपोर्टनुसार, 2019 आयफोनमध्ये रियल कॅमेरा लेन्स काही विशेष डिझाईन्स सह देण्यात आले आहे. हा आयफोन जुलै-ऑगस्ट च्या दरम्यान सेट केला जाईल.
मेकरियूमर्स ने मागील आठवड्यात असे वक्तव्य केले होते की, "5G सेवेव्यतिरिक्त या आयफोनमध्ये रिय कॅमेरा, फुल स्क्रीन टच आयडी आणि LG सह OLED स्क्रीनच्या माध्यमातून 3D सेटिंगसुद्धा असू शकते."
तसेच अॅप्पल कंपनी 2020 पर्यंत आपल्या सर्वच आयफोनला OLED स्क्रीनमध्ये बदलेल असे सांगण्यात येतय.
Apple कंपनी भारतात iPhone6 आणि iPhone 6 Pluse ची विक्री बंद करणार
अलीकडेच जगप्रसिद्ध अॅपल (Apple) कंपनी लवकरच iPhone मध्ये ट्रिपल कॅमरा असणारा फोन लाँन्च करणार आहे, अशी घोषणा केली होती. तसेच LCD पद्धतीने हे नवीन मॉडेल बनविण्यात येणार आहे. याबाबतचा खुलासा वॉल स्ट्रिट जर्नलमध्ये करण्यात आला होता.