2019 वर्ष संपण्यास अवघा एक महिना शिल्लक राहिला आहे. तर या वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर पासून सामान्यांच्या डोक्यावरचा बोझा वाढणार आहे. कारण 1 डिसेंबर पासून मोबाईल फोन उपभोक्त्यांना कॉलिंगसाठी टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ करण्यात येणार आहे. टेलिकॉम कंपन्यांनी याबाबत आधीच घोषणा केली आहे. टेलिकॉम सेक्टरमधील तज्ञांच्या मते 14 वर्ष जुन्या एजीआर प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर कंपन्यांवरील कर्जाचा दबाव वाढला आहे. यामुळेच कंपन्यांनी टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
भारतीय टेलिफोन कंपन्या म्हणजेच आयडिया, वोडाफोन आणि एअरटेल 1 डिसेंबर पासून त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवणार आहेत. कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी कंपन्यांकडून हा निर्णयाचा विचार केला आहे. मात्र कंपन्यांनी किती रुपयांनी टेरिफ प्लॅनचे दर वाढवणार हे स्पष्ट केलेले नाही. तर एअरटेल यांनी असे म्हटले आहे की, टेलिकॉम सेक्टरमध्ये नवे तंत्रज्ञान आणण्यासाठी अधिक गुंतवणूक करणे महत्वाचे आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, एअरटेल 100 रुपयांचा रिचार्ज 135 रुपयांना करणार आहे.(खुशखबर! आता BSNL एसएमएसवरही देणार 6 पैशांचा कॅशबॅक)