Flipkart's Flipstart Days Sale: अक्षय तृतीयेच्या निमित्ताने Flipkartच्या ग्राहकांना धमाकेदार ऑफर्स, या उत्पादनांवर मिळणार भारी सूट
Flipkart Flipstart Days Sale 2019 (Photo Credits: Flipkart)

 Akshay Trutiya 2019 Offers At Flipkart : ऑनलाईन शॉपिंगमधील ( Online Shopping) अग्रगण्य नाव म्हणजे 'फ्लिपकार्ट' (Flipkart) नेहमीच आपल्या एका पेक्षा एक भारी ऑफर्समुळे ग्राहकांच्या चर्चेचा विषय असते. यंदा 7 मे ला येऊ घातलेल्या अक्षय तृतियेच्या (Akshay Trutiya 2019) निमित्ताने फ्लिपकार्ट चा फ्लिपस्टार्ट सेल (Flipkart Flpistart Sale)  ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. या सेल दरम्यान वेगवेगळ्या घरगुती उपकरणांसोबत, गेमिंग साधनांवर देखील मोठी सूट देण्यात येईल. इतकंच नव्हे तर ऍक्सिस बँक (Axis Bank)  च्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास ग्राहकांना अधिक 10 टक्के सूट मिळवता येऊ शकते. 3 मे ला सुरु होऊन पुढील तीन दिवस तुम्हाला आवडत्या व गरजेच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्ताच्या आधीच अगदी कमी दरात विकत घेता येतील. Akshay Tritiya 2019: अक्षय तृतीयेला का कराल सोन्याची खरेदी? जाणून घ्या यामागील ५ मुख्य कारणं

या सेल दरम्यान कोणत्या ऑफर्सचा तुम्हाला सर्वाधिक फायदा होऊ शकतो जाणून घ्या...

    • या तीन दिवसात जेबीएल , सोनी बोअर यासारख्या प्रख्यात कंपन्यांचे हेडफोन्सवर 70 टक्क्यांपर्यंगत सूट मिळवू शकता.
    • टीव्हीच्या जवळपास सर्वच ब्रँड वर 75 टक्के सूट देण्यात येणार आहे. यात स्मार्ट टीव्हींचा देखील समावेश असेल.
    • मोबाईल साठीच्या पॉवरबँक्सची विक्री 500 रुपयांपासून सुरु होईल.
    • Xiaomi’s Mi LED TV 4A Pro (32-inch) Smart TV ज्याची मूळ किंमत 12,999 इतकी आहे हा ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय च्या पर्यायने प्रतिमहिना 2,167 रुपयात खरेदी करता येईल. याचसोबत जुना टीव्ही बदलून घेतल्यास ग्राहक 7,000 रुपयापर्यंत सूट मिळवू शकतात.

  • गेमिंग लॅपटॉप्सची खरेदी करताना देखील मोठी ऑफर देण्यात आली आहे. the Dell Inspiron Core i5 8th Generation (INSP 5570) लॅपटॉप हा केवळ 44,990 रुपयात खरेदी करता येणार असून यावर देखील नो कॉस्ट ईएमआयच्या पर्यायच वापर करून प्रतिमहिना 2500 रुपयात खरेदी करता येईल. या बदल्यात जुना लॅपटॉप दिल्यास एक्सचेंज ऑफर अंतर्गत 10,500 रुपयांची बचत करता येऊ शकते.
  • Acer Predator Helios 300 Core i5 चा गेमिंग लॅपटॉप 62,990 रुपयात उपलब्ध असून यावर एक्सचेंज ऑफर लागू केल्यास 10,500 रुपये वाचवता येतील.

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर खरेदीचा श्रीगणेशा करण्यासाठी यंदा 3  मे पासून सुरु होणाऱ्या फ्लिपकार्ट फ्लिपस्टार्ट डेज सेलचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतेय.