20 जानेवारीपासून सुरु होईल Flipkart Republic Day Sale; मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप वर मिळेल जबरदस्त सूट
Flipkart Republic Day Sale (Photo Credit : Twitter)

Flipkart Republic Day Sale: फ्लिपकार्ट, (Flipkart) अॅमेझॉन (Amazon) यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्या नवनव्या निमित्ताने सेलचे आयोजन करत असतात. अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल 20-23 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे अॅमेझॉनला टक्कर देण्यासाठी फ्लिपकार्टने प्रजासत्ताक दिनानिमित्त 20 जानेवारीपासून सेलचे आयोजन केले आहे. 20-22 जानेवारीपर्यंत Flipkart Republic Day Sale असणार आहे. या सेलमध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप आणि टीव्ही वर जबरदस्त डिल्स मिळणार आहेत.

सोबतच रश अव्हर आणि अतिरिक्त 26% डिस्काऊंट मिळेल. या सेलमध्ये एसबीआयच्या (SBI) क्रेडिट कार्डवरुन शॉपिंग केल्यास 10% अधिक सूट दिली जात आहे. या सेलमध्ये एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय देखील उपलब्ध आहे.

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, टीव्ही आणि अप्लायन्सवर 75% डिस्काऊंट आणि इलेक्ट्रॉनिक व अन्य वस्तूंवर 80% डिस्काऊंट मिळत आहे. तर ब्रॅडेंड प्रॉडक्टसवर 70% डिस्काऊंट दिले जात आहे. 20 तारखेपासून सेल सुरु होत असला तरी फ्लिपकार्ट प्लस युजर्स 19 जानेवारीपासूनच या सेलची आनंद घेऊ शकतात.

या सेलअंतर्गत मोबाईल फोन, टीव्ही, लॅपटॉप इत्यादींवर एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देण्यात येईल. मात्र नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय Bajaj Finserv आणि काही निवडक बँकेच्या डेबिट, क्रेडिट कार्डवर दिला जात आहे.