Flipkart Sale: आजपासून फ्लिपकार्ट सेल सुरु, 'या' वस्तूंवर मिळणार 80% सूट
Flipkart Flipstart Days Sale 2019 (Photo Credits-Twitter)

Flipkart Sale: फ्लिपकार्टवर पुन्हा एकदा आजपासून फ्लिपस्टार्ट डे सेल (Flipstart Days Sale) सुरु झाला असून 3 जून पर्यंत सुरु राहणार आहे. या तीन दिवसांच्या धमाकेदार सेलमध्ये ग्राहकांना विविध वस्तूंवर भरघोस सूट मिळणार आहे. तर एक्सिक बँक कार्डधारकांना खरेदीवर अतिरिक्त 10 टक्के सूट देण्यात येणार आहे.

फ्लिपस्टार्ट सेलमध्ये हेडफोन, लॅपटॉप,पॉवर बँक,मोबाईल कव्हर या वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तर 2019 च्या वर्षातील फ्लिपकार्टवरील हा तिसरा सेल सुरु झाला आहे. त्याचसोबत विविध वस्तूंवरसुद्धा 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. ई-कॉमर्स कंपनी जेबीएल, सोनी आणि अन्य कंपन्यांच्या हेडफोन्सवर 70 टक्क्यांपर्यंत ग्राहकांना सूट मिळणार आहे. त्याचसोबत एचपी, एसर यांसारख्या कंपन्यांच्या लॅपटॉपवर सुद्धा सूट देण्यात आली आहे. तर 12,990 रुपयांच्या सुरुवाती किंमतीच्या लॅपटॉप खरेदी करता येणार आहेत.(Flipkart Bumper Offer: गुगलच्या स्मार्टफोनवर तब्बल 28,000 हजारांचा डिस्काउंट; स्टॉक संपेपर्यंतच मिळेल सवलत)

जर तुम्ही फ्लिपकार्ट सेलच्या माध्यमातून टिव्ही खरेदी करणार असल्यास त्यावर तुम्हाला 75 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तर एअर कंडिशनर आणि फ्रिज खरेदीवर 50 टक्के सूट देण्यात आली आहे.