Flipkart Carnival Sale 2018: 'या' इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळेल 70% डिस्काऊंट
फ्लिपकार्ट (Photo Credit: Official)

ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart ने वर्षाखेरीस नवा सेल आणला आहे. Flipkart ने Year End Carnival सेलचे आयोजन केले आहे. या सेलअंतर्गत घरगुती उपकरणांवर 70% डिस्काऊंट मिळत आहे. 23-31 डिसेंबर पर्यंत हा सेल सुरु राहील. यात रोज दुपारी 12 ते रात्री 2 पर्यंत Christmas Rush deals दिल्या जातील.

या सेलअंतर्गत ग्राहकांना इंटरेस्ट फ्री नो कॉस्ट ईएमआय स्कीम 12 महिन्यांसाठी देण्यात येईल. त्याचबरोबर 399 रुपयांत तुम्ही उपकरणाची एक्सटेंडेड वॉरंटी मिळवू शकता. याशिवाय 22,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्याचबरोबर कंपनीकडून 'grab now or gone' या डिल अंतर्गत युजर्सला 80% डिस्काऊंट मिळत आहे. SBI डेबिट कार्ड यूजर्सला 10% पर्यंत अतिरिक्त डिस्काऊंट दिला जात आहे.

Flipkart च्या या सेलअंतर्गत होम अप्लायन्सेस स्वस्त दरात उपलब्ध होत आहेत. Xiaomi Mi 4A स्मार्ट टीव्ही (43 इंच) यावर 1000 रुपयांचे डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे हा टीव्ही तुम्ही या सेलमध्ये फक्त 21,999 रुपयांना खरेदी करु शकता. याशिवाय Samsung चा 32 इंचाच्या HD LED TV वर 10,901 रुपयांचे डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे हा टीव्ही तुम्ही फक्त 15,999 रुपयांना खरेदी करु शकता. Vu 43-इंच 4K स्मार्ट TV ची किंमत 41,000 रुपये आहे. मात्र या सेलमध्ये हा टीव्ही तुम्ही 24,999 रुपयांना खरेदी करु शकता.

Vu 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही आणि Vu 40-इंच फुल एचडी एलईडी टीव्ही अनुक्रमे 12,999 आणि 15,499 रुपयांना खरेदी करु शकता. Thomson B9 Pro 40 इंचाचा फुल एचडी स्मार्ट टीव्ही तुम्ही 17,999 रुपयांना खरेदी करता येईल. या टीव्हीची खरी किंमत 25,999 रुपये आहे. तसंच या सेलअंतर्गत Micromax 32 इंचाचा एचडी टीव्ही तुम्ही 10,499 रुपयांना खरेदी करु शकता.

या कार्निवल सेलमध्ये ग्राहकांना Kent, Xiaomi, Tefal, Honeywell यांसारख्या कंपन्यांच्या एअर प्युरीफायर्सवर देखील चांगली सूट मिळत आहे. हे प्युरीफायर्स 5,000 रुपयांपासून उपलब्ध आहेत. याशिवाय वॉशिंग मशीन, रेफ्रीजरेटर्सवर चांगल्या डिस्काऊंट ऑफर्स मिळत आहेत.