iPhone 11 आणि iPhone XR स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी, फ्लिपकार्टवर 16 जूनपर्यंत सेल सुरू
iphone (Photo Credits: File Photo)

तुम्ही नवा आयफोन (iPhone) खरेदी करण्याचा विचार करत आहात? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महत्वाचे म्हणजे, आयफोन खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. दरम्यान, ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर सध्या बिग सेव्हिंग डेज सेल (Big Saving Days sale) सुरू आहे. या सेलमध्ये तुम्हाला आयफोन 11 आणि आयफोन एक्स आर हे दोन्ही स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. परंतु, हा सेल केवळ 16 जून 2012 पर्यंत सुरु राहणार आहे. यामुळे तुम्हाला याआधीच हे दोन्ही स्मार्टफोन खरेदी करावे लागणार आहेत. या सेलनंतर हे दोन्ही स्मार्टफोन त्यांच्या मूळ किंमतीत खेरदी करावे लागतील.

फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये आयफोन 11 (64 जीबी स्टोरेज) स्मार्टफोन किंमत 49 हजार 999 मिळत आहे. याचबरोबर 128 जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोन 56 हजार 999 रुपयात खरेदी करता येणार आहे. तर, 256 जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोनची किंमत 66 हजार 999 इतकी देण्यात आली आहे. याशिवाय, तुमच्याकडे एसबीआयचे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 10 टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळेल. फोनमध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले 12MP + 12MP चा रियर कॅमेरा, 12MP चा फ्रंट कॅमेरा आणि A13 बायोनिक चिपसेट दिले आहे. हे देखील वाचा- Poco M3 Pro 5G च्या ऑनलाईन सेलला Flipkart वर सुरुवात; येथे पहा ऑफर्स

या सेलमध्ये आयफोन एक्स आर (64 जीबी स्टोरेज) ची किंमत 39 हजार 999 देण्यात आली आहे. तर 128 स्टोरेज असलेला स्मार्टफोन 42 हजार 999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. या फोनमध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले 12 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 7 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि ए12 बायोनिक चिपसेट सारखे फीचर्स दिले गेले आहेत.