फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज' सेल सुरु ; या मोबाईलवर मिळत आहे 8000 ची सूट
फ्लिपकार्ट (File Photo)

फ्लिपकार्टवर प्रत्येक वर्षी होणाऱ्या बिग बिलियन डेज सेल यंदा 10० ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. ज्यात जबदरस्त डिस्काऊंट आणि कॅशबॅक ऑफर मिळेल. ही सूट 14 ऑक्टोबरपर्यंत दिली जाईल. सेल सुरु व्हायला अवधी असला तरी Huawei चा सब ब्रँड Honor ने आपल्या स्मार्टफोनवरील सूट, बायबॅक ऑफर जाहीर केली आहे. Flipkart वर 10 ऑक्टोबरपासून सेल ; या प्रॉडक्ट्सवर मिळेल बंपर सूट

Honor 9N, Honor 7A, Honor 7S, Honor 9 Lite आणि Honor 9i वर सूट मिळत नाही. हॉनर या स्मार्टफोन्सवर मोबाईल प्रोटेक्शन देखील दिले जात आहे.

Honor 9N:

हा 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज क्षमता असलेला फोन आहे. याची किंमत 13,999 रुपये आहे. पण ऑफरअंतर्गत हा फोन 9,999 रुपयांत मिळेल. Honor 9N च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या स्मार्टफोनची किंमत 16,999 रूपये आहे. पण ऑफरअंतर्गत हा फोन 11,999 रुपयांना मिळेल.

Honor 7A:

8,999 रुपयांच्या ऑनर 7A वर 1,000 रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन 7,999 रुपयांत उपलब्ध होईल.

Honor 7S:

अलिकडेच लॉन्च झालेला Honor 7S या् सेलमध्ये केवळ 6,499 रुपयांना मिळेल. या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये आहे.

Honor 9 Lite:

3 जीबी रॅम आणि 32 जीबी internal storage असलेल्या ऑनर 9 lite वर 1,000 रुपयांची सूट मिळत आहे. तर 4 जीबी रॅम, 64 जीबी internal storage असलेला Honor 9 Lite तुम्हाला 14,999 रुपयांना मिळेल.

Honor 9 i:

14,999 किंमत असलेल्या या फोनवर 2,000 ची सूट मिळेल.