भारत सरकारने युजर्सची प्रायव्हेसी आणि सिक्युरिटी लक्षात घेता या वर्षात चीनी अॅप्स आणि गेम्सवर बंदी घातली आहे. यामध्ये लोकप्रिय PUBG मोबाईल गेमचा सुद्धा समावेश आहे. या गेमवर बंदी घातल्यानंतर युजर्सला उत्तम ऑप्शन मिळावा यासाठी FAU-G गेम लॉन्च करण्याची तयारी केली जात आहे. हा गेम गेल्या दिवसात प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध ही करुन दिला आहे. फक्त 3 दिवसात 10 लाखांहून अधिक युजर्सने यासाठी रजिस्ट्रेशन केले आहे. त्यानंतर आता याच्या लॉन्चिंग डेट संबंधित माहिती समोर आली आहे.(Fearless And United-Guards: PUBG बॅन झाल्यानंतर Akshay Kumar घेऊन येत आहे स्वदेशी अॅक्शन गेम FAU:G, जाणून घ्या खासियत)
InsideSport वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, FAU-G गेम अधिकृतरित्या भारतात या महिन्याच्या अखेरीस लॉन्च केला जाऊ शकतो. FAU-G ची टेव्हलपर कंपनीकडून याच्या लॉन्चिंग संबंधित कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र प्री-रजिस्ट्रेशन आणि आता रिपोर्टनंतर असे सांगितले जात आहे की, गेमसाठी युजर्सला अधिक वाट पहावी लागणार नाही आहे.(PUBG Mobile India आज लॉन्च होण्याची शक्यता; FAU-G पेक्षा मिळाले अधिक प्री-रजिस्ट्रेशन)
दरम्यान, FAU-G गेमची डेव्हलपर कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवच्या माध्यमातून माहिती शेअर करत म्हटले होते की, तीन दिवसांच्या आतमध्ये FAU-G गेमला 10 लाखांहून अधिक लोकांनी प्री-रजिस्ट्रेशन केले आहे. म्हणजेच लॉन्चिंगपूर्वीच हा गेम लोकप्रिय होत चालला आहे. जर तुम्हाला सुद्धा याचे प्री-रजिस्ट्रेशन करायचे असल्यास तर गुगल प्ले येथ जाऊन करु शकता. या गेममुळे पबजी गेमला चांगलीच टक्कर दिली जाणार आहे.