Fastrack चे शानदार Reflex 3.0 फिटनेस बँन्ड भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत
Fastrack Reflex 3.0 (Photo Credits-Twitter)

फास्टट्रॅक कंपनीने आपले दोन फिटनेस बँन्ड Fastrack Reflex3.0 आणि Reflex Tunes भारतात लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फिटनेस बँन्ड अॅन्ड्रॉइड आणि IOS डिवाइससह काम करणार आहे. तसेच या दोन्हींमध्ये दमदार बॅटरीसह स्लिप आणि हार्ट रेट मॉनिटर करणारे सेंसर मिळणार आहे. तर जाणून घ्या फास्ट्रॅक फिटनेस बँन्डच्या स्पेसिफिकेशनसह किंमतीबद्दल अधिक माहिती.Fastrack Reflex 3.0 च्या फिटनेस बँन्डची किंमत 2495 रुपये आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 20 वॉच फेससह 10 अधिक स्पोर्ट मोड्स दिले गेले आहेत. या व्यतिरिक्त युजर्सला फिटनेस बँन्डमध्ये हार्ट मॉनिटरसह फोन फायइंडर, स्लिप ट्रॅकर आणि अलार्म सारखे फिचर्स मिळणार आहेत.

फास्टट्रॅक रिफ्लेक्स ट्युन्स फिटनेस बँन्डची किंमत 1795 रुपये आहे. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह रिटेल स्टोअरच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे. तसेच फिटनेस बँन्ड अॅन्ड्रॉइड आणि आयओएस डिवाइससह काम करणार आहे. या डिवाइसमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लुटूथ 5.0 दिले गेले आहे. ज्याची रेंज 8 मीटरहून अधिक आहे. या व्यतिरिक्त युजर्सला फिटनेस बँन्डमध्ये दमदार बॅटरी मिळणार आहे. जी सिंगल चार्जमध्ये 6 ते 26 तासांची बॅटरी बॅकअप देणार आहे.(Reliance JioBook Laptop: स्वस्त स्मार्टफोननंतर आता रिलायन्स सादर करत आहे 'जिओबुक लॅपटॉप', लवकरच भारतात होणार लाँच)

Tweet:

Fastrack Reflex 2C Pay फिटनेस बँन्ड YONO SBI सह लवकरच लॉन्च केला जाणार आहे. युजर्सला या बँन्डच्या माध्यमातून कॉनॅक्ट लेन्स पेमेंट करता येणार आहे. तसेच कंपनीने वायरलेस ईअरबड्स नेकबँन्ड आणि हेडफोन सुद्धा उतरवले आहेत.

दरम्यान, कंपनीने 2017 मध्ये अॅक्टिव्हिटी ट्रॅकर Reflex लॉन्च केले होते. या डिवाइसची किंमत 1995 रुपये ठेवली होती. यामध्ये कॉल आणि टेक्सट मेसेजसाठी नोटिफिकेशन सुद्धा दिसणार आहे. हे ट्रॅकर तुम्हाला जर inactive दिसत असल्यास ते तुम्हाला उठून चालण्याचा सल्ला देणार आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, हे डिवाइस स्पेशल रेसिस्टंट म्हणजेच अंघोळ करताना घालू शकत नाही.(Amazon Mega Home Summer Sale: 7 मार्चपर्यंत अॅमेझॉनचा मेगा होम समर सेल; AC, TV, फ्रिजसह 'या' वस्तूंवर मिळणार आकर्षक ऑफर्स)

हे ट्रॅकर कोणत्याही युएसबी अॅडेप्टर, लॅपटॉप आणि डेस्कटॉप पीसी वर युएसबी पोर्टच्या माध्यमातून चार्ज करता येणार आहे. या फास्टट्रॅक रिफ्लॅक्सची टक्कर शाओमी मी बँन्ड 2 सोबत होणार आहे. मी बँन्डमध्ये 2 हार्ट सेंसर दिले असून ते फास्टट्रॅक रिफ्लेक्स मध्ये नाही आहेत.