Facebook Friend Requests: फेसबुक पाठवतंय स्वयंचलीत मैत्रीप्रस्ताव; बगबद्दल मेटाकडून दिलगिरी व्यक्त
Facebook | Image Used For Representational purpose Only

सोशल मीडिया मंच फेसबुकची मातृसंस्था असलेल्या मेटा (Meta) कंपनीने एक फेसबुक बग (Facebook Bug) शोधला आहे. ज्यामध्ये सोशल नेटवर्क वापरकर्ते जेव्हा कोणत्याही प्रोफाइलला भेट देतात तेव्हा वापरकर्त्याच्या परस्पर त्याच्या नकळतपणे स्वयंचलित फ्रेंड रिक्वेस्ट (Facebook Friend Requests) पाठवली जात होती. या प्रकारानंतर सोशल मीडियावर (खास करुन ट्विटर) फेसबुक वापरकर्त्यांकडून स्क्रीनशॉट ट्विट करण्याची एक मालिकाच सुरु झाली होती. त्यानंतर एका निवेदनात, मेटाने हा एकप्रकारचा बग असल्याचे सांगितले. तसेच, या बगमुळे काही फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट चुकून पाठवण्यात आल्या होत्या. वापरकर्त्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आता हा बग काढून टाकण्यात आल्याचेही सांगितले.

फेसबुक आणि ट्विटर हे दोन्ही प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या वापरकर्त्यांनी ट्विटरवर फेसबुकला तक्रार केली की, त्यांनी भेट दिलेल्या प्रोफाइलवर फेसबुक विनंत्या पाठवत आहे. काही वापरकर्त्यांनी त्यांच्या गोपनीयतेबद्दल चिंता व्यक्त केली. तर काहींनी याबाबत मिम्सम बनवत काहीसा विरंगुळाही शोधला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार खास करुन बांग्लादेश, फिलीपिन्स आणि श्रीलंका येथील वापरकर्त्यांनी बगबद्दल विशेष तक्रार केली. (हेही वाचा, Twitter New CEO: ट्विटरचे नवीन सीईओ म्हणून Linda Yaccarino यांची निवड; Elon Musk यांनी ट्विटद्वारे दिली माहिती)

वापरकर्त्यांकडून प्राप्त तक्रारीची कंपनीने त्वरीत दखल घेतली. त्रुटी शोधून ती दुरुस्त केल्याचे सांगून त्याबद्दल माफी मागितली. मेटा प्रवक्त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, टेक जायंटने डेली बीस्टसह एक विधान सामायिक केले आहे की, आम्ही अलीकडील अॅप अपडेटशी संबंधित एक बग निश्चित केला आहे ज्यामुळे काही फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट चुकून पाठवल्या गेल्या आहेत. हा प्रकार आता थांबला आहे. त्रुटी दूर झाली आहे. घडल्या प्रकाराबद्दल आम्ही दिलगीर आहोत.