Facebook ने लाँच केला नवा लोगो; जाणून घ्या त्या मागची कारणं
फेसबुक (Photo Credits: ANI)

सोशल मीडियाच्या ऑनलाईन विश्वात फेसबुक (Facebook) हे खूप प्रसिद्ध नाव आहे. याचं फेसबुकने आजवर दूर राहणाऱ्या लोकांनाही एकत्र बांधून ठेवत संवाद सोपा केला. कायम नवे फीचर्स आणत फेसबुक कंपनीने लोकांसाठी नेहमीच नवं काहीतरी द्यायचं ठरवलं, मग ते मेसेंजर असो वा फेसबुकचं न्यूज फीचर.

असाच एक नवा बदल पाहायला मिळणार आहे तो म्हणजे फेसबुकच्या लोगो मध्ये. होय, फेसबुक लवकरच आपल्यासमोर एका नव्या रूपात नव्या लोगोसहित भेटायला येणार आहे.

नुकताच फेसबुक कंपनीने आपला नवा लोगो लाँच केला असून हा लोगो एका खास उद्देशाने तयार केला आहे. या नव्या लोगोचे वैशिष्ट्य म्हणजे यात सर्व इंग्रजी अक्षरं कॅपिटलमध्ये आहेत व हा लोगो वेगवेगळ्या रंगात असून हे रंग इंस्टाग्राम किंवा व्हॉट्स ऍपसारखे फेसबुकचे इतर प्रोडक्ट दर्शवतात. तसेच हा नवा लोगो GIF च्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला असून तो मूव्हिंग आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका रिपोर्टनुसार फेसबुकचा हा नवा लोगो काही आठवड्यातच युजर्सना पाहायला मिळणार आहे.

5G च्या येण्याने बदलणार जग; पाहायला मिळणार 'हे' नवे बदल

सध्या फेसबुक कंपनी इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर असे विविध अ‍ॅप्स चालवते. त्याचबरोबर ही कंपनी ऑक्युलस, वर्कप्लेस, पोर्टल आणि कॅलिब्रा (‘लिब्रा’ ही डिजिटल करन्सी) अशा अनेक सुविधा देखील पुरवते. आणि आतापर्यंत ‘फेसबुक अ‍ॅप’चाच लोगो फेसबुक कंपनीसाठी वापरला जात होता. पण यापुढे मात्र फेसबुक कंपनी आपला नवा लोगो वापरेल, तर फेसबुक अ‍ॅपसाठी जुनाच लोगो कायम राहील.