Global Outage: जगभरात फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअॅप (Whatsapp) डाऊन झाल्याची बातमी आहे. सोमवारी रात्री उशिरा ही कोंडी झाली. Downdetector ने देखील याची पुष्टी केली आहे. 13,000 वापरकर्त्यांनी इन्स्टाग्राम, 5,400 फेसबुक आणि 1,870 वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅपबद्दल तक्रारी केल्या आहेत. Downdetector जगातील सर्व साइटवरील आउटेज ट्रॅक करतो. या मोठ्या आउटेजवर मेटाने अद्याप काहीही वक्तव्य केलेलं नाही. ही तिन्ही सोशल मीडिया गॅजेट जवळपास 2 तास ठप्प राहिल्याचे म्हटले जात आहे.
फेसबुक डाऊन झाल्यानंतर मेटाच्या अॅड मॅनेजरमध्ये समस्या निर्माण झाली होती. या काळात वापरकर्ते त्यांच्या फेसबुक पेजवर जाहिराती ठेवू शकले नाहीत. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप भारतात चांगले काम करत आहेत. परंतु, अमेरिकेसह अनेक देशांतील वापरकर्त्यांना फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. (हेही वाचा -Threads App: चिंता मिटली, यूजर्स थ्रेड्स अकाऊंट डिएक्टिव्हेट करू शकता; तुमचे इन्स्टाग्रामवर डिलीट होणार नाही - Adam Mosseri)
eu faço hacking ético para um bom propósito
hacke de telefone
hackear/espião do WhatsApp
Espião do Facebook/Instagram
Recuperação de contas de mídia social#WhatsApp#whatshappeninginthailand#whatsappgate#whatsappdown #whatsappspy#Hacked #hackedwhatsapp pic.twitter.com/od2kpr65my
— Kevin Poulsen Hacker (@Kevinhack_01) July 11, 2023
यापूर्वी, इंस्टाग्राम गेल्या महिन्याच्या सुरुवातीला डाऊन झाले होते. त्यादरम्यान, 56 टक्के वापरकर्त्यांना Instagram अॅपमध्ये समस्या होत्या, तर 23 टक्के वापरकर्त्यांना लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. 21 टक्के वापरकर्त्यांनी सर्व्हर त्रुटीबद्दल तक्रार केली. इन्स्टाग्राम व्यतिरिक्त अनेक फेसबुक युजर्सनीही आउटेजबद्दल तक्रार केली. अनेक फेसबुक वापरकर्त्यांची टाइमलाइन रिफ्रेशिंग नव्हती.