जेव्हा पासून ट्विटर एलॉन मस्क यांनी विकत घेतल आहे तेव्हा पासून ट्विटर या सोशल मिडीया प्लाटफॉर्मची रोज चर्चा होते. कधी ट्विटरचा नवा अपडेट, कधी ट्विटरचा वाद, ट्विटरची ब्लू टिक, ट्विटरचं सबस्क्रीपशन, ट्विटर मधील नोकर कपात अशा कुठल्या ना कुठल्या बाबीतून ट्विटर कायम चर्चेत असतं पण यावेळी ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांच्या ट्विटनंतर टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये कळबळ माजली आहे. जगभरात एलॉन मस्कच्या त्या ट्विटची जोरदार चर्चा होत आहे. एलॉन मस्क कायमचं ट्विटरवर ट्विट करत ट्विटर वापरकर्त्यांचा सल्ला घेताना दिसतात. यापूर्वीही ट्विटर मधील अपडेल, ट्विटरचे नवे फिचर, ट्विटरमध्ये काय असावे आणि काय असु नये अश्या आशयाचं ट्विट करत ट्विटर वापरकर्त्यांकडून सल्ला मसलत घेतात. पण यावेळी एलॉन मस्क यांनी ट्विट करत थेट ट्विटरमध्ये त्यांनी स्वत असू की नये असाचं सल्ला ट्विटर वापरकर्त्यांकडून घेतला आहे.
म्हणजे तुम्हीही हे वाचून जरा गोंधळात पडू शकता. पण जेव्हा तुम्ही एलॉन मस्क यांचं ट्विट वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल. एलॉन मस्क यांनी एक पोल ट्विट केलं आहे, ज्यात त्यांनी विचारलं आहे की मी ट्विटरचं प्रमुख पद सोडून द्यावं का? या पोलनुसार ट्विटरचे वापरकर्ते जे काही उत्तर देतील ते मला मान्य असेल. मस्क यांच्या या ट्विट नंतर सोशल मिडीयावर खळबळ माजली आहे. लोक उत्सफूर्तपणे पोलला उत्तर देत आपली प्रतिक्रीया कळवत आहेत. तरी या पोलचा अंतीम निर्णय काय येणार याची नेटकऱ्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. (हे ही वाचा:- Twitter Gold Tick: आता ट्विटरवर दिसणार रंगबेरंगी टिक; जाणून घ्या गोल्ड, ग्रे आणि ब्लू टिक कोणाला?)
Should I step down as head of Twitter? I will abide by the results of this poll.
— Elon Musk (@elonmusk) December 18, 2022
या पोलचा निकाल काय येणार? याची उत्सुकता आता शिगेला पेटली आहे. या पोलचा निकाल होकारार्थी आला तर ठिक पण नकारार्थी आल्यास एलॉन मस्क खरचं ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार का अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे. एलॉन मस्क यांच्या या ट्विटला आतापर्यत १७ लाखांहून अधिक लोकांनी रीट्विट केलं असून २५ लाखांहून अधिक ट्विटर वापरकर्त्यांनी या ट्विटला लाईक केलं आहे.