
Elon Musk Had Sex With SpaceX Employee: अब्जाधीश एलोन मस्क (Elon Musk) एका खास कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मस्क यांच्यावर स्पेसएक्स (SpaceX) कर्मचारी आणि इंटर्नशी लैंगिक संबंध (Sex) ठेवल्याचा आरोप आहे. महत्वाचे म्हणजे मस्क यांनी एका महिला कर्मचाऱ्याला आपल्या मुलांना जन्म देण्यासही दबावही टाकला होता. स्पेसएक्स ही एलोन मस्कची कंपनी आहे. ही कंपनी स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन म्हणून काम करत आहे. एलोन मस्क हे इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे सीईओ देखील आहेत.
वॉल स्ट्रीट जर्नलने अहवाल दिला की, मस्क यांनी त्यांच्या स्पेस-एक्स आणि टेस्ला या दोन्ही कंपन्यांमधील महिला कर्मचाऱ्यांसाठी अस्वस्थ वातावरण निर्माण केले. रिपोर्टनुसार, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर मस्क यांनी या स्पेस-एक्सच्या महिला इंटर्नला आपल्या कार्यकारी टीममध्ये समाविष्ट केले.
अजून एका महिलेचा दावा आहे की, मस्कने तिला अनेक वेळा मुले जन्माला घालण्यास सांगितले, परंतु तिने तसे करण्यास नकार दिला. मस्कची ऑफर नाकारल्यानंतर, महिलेला पगार वाढ नाकारण्यात आली आणि तिच्या कामगिरीबद्दल तक्रारी देखील केल्या गेल्या. मस्क यांच्यावर अशा आरोपांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2021 मध्ये, स्पेस-एक्सच्या 5 माजी कर्मचाऱ्यांनी दावा केला होता की, मस्कच्या स्पेस कंपनी स्पेस-एक्समध्ये लैंगिक छळ होतो. खासगी विमानात फ्लाइट अटेंडंटसमोर स्वत:ला नग्न केल्याचाही आरोप मस्कवर आहे. (हेही वाचा: Japan : जन्मदर वाढवण्यासाठी टोकियो प्रशासन डेटिंग ॲप लॉन्च करण्याच्या तयारीत; नेमकं प्रकरण काय? घ्या जाणून)
आणखी एका महिलेने सांगितले की, 2014 मध्ये तिचे एलोन मस्कसोबत महिनाभर शारीरिक संबंध होते. काही काळानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि तडजोड करून तिला कंपनी सोडण्यास भाग पाडले. यासोबतच मस्क यांनी अनेकवेळा आपल्या कर्मचाऱ्यांना घरी बोलावले होते. हे प्रकरण फक्त सेक्सपुरतेच मर्यादित नाही. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, एलोन मस्ककडून बेकायदेशीर ड्रग्सचे सेवन केले जात आहे. अलीकडे असा दावा करण्यात आला होता की, मस्कने बोर्डाच्या काही सदस्यांसह एलएसडी, कोकेन, एक्स्टसी, केटामाइन यांसारखे धोकादायक ड्रग्ज अनेक वेळा घेतले होते.