Twitter | (Photo Credit - File Image)

Twitter Open Source Code: एलोन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर ट्विटरमधील अनेक फिचर्संमध्ये बदल केले आहेत. ट्विटरने यापूर्वी ट्विटर ब्लूची घोषणा केली होती. या अंतर्गत, तुम्ही महिन्याचे पैसे भरून ब्लू टिक मिळवू शकता. याशिवाय ट्विटरमध्ये ट्विटची शब्द मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्याच वेळी, तुमचे ट्विट किती लोकांपर्यंत पोहोचले हे देखील तुम्ही तपासू शकता. आता एलोन मस्कने सोशल मीडियावर जाहीर केले आहे की, ते त्याचे सर्व कोड ओपन सोर्स (Twitter Open Source Code) करणार आहे.

एलोन मस्क यांनी ट्विट करून सांगितलं आहे की, '31 मार्चपासून ट्विटर सर्व कोड ओपन सोर्स करेल, ज्याद्वारे ट्विटर लोकांना ट्विट शिफारसी पाठवते. हा अल्गोरिदम खूपच गुंतागुंतीचा आहे. लोकांना सुरुवातीला या अतिशय मूर्ख गोष्टी वाटतील. आम्हाला कोणतीही समस्या आढळल्याबरोबर आम्ही त्या उणीवा दूर करू. कोड पारदर्शकता सुरुवातीला आमच्यासाठी लाजिरवाणी असू शकते, परंतु आम्ही त्यात अधिक चांगले होऊ. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही तुमचा विश्वास जिंकू.' (हेही वाचा -WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर)

एलॉन मस्क यांनी याआधी फेब्रुवारीच्या सुरुवातीला ट्विटरचा अल्गोरिदम ओपन सोर्स बनवण्याबाबत सांगितले होते. एका वापरकर्त्याच्या प्रश्नाच्या उत्तरात, एलोन मस्कने लिहिले, 'पुढच्या आठवड्यात आमचे अल्गोरिदम ओपन सोर्स झाल्यावर निराश होण्याची तयारी करा. परंतु, कालांतराने यामध्येही सुधारणा होत जाईल.' मार्च 2022 मध्ये, एलोन मस्कने एक ऑनलाइन सर्वेक्षण देखील केले, ज्यामध्ये ट्विटर वापरकर्त्यांना Twitter चे अल्गोरिदम ओपन सोर्स बनवण्यास सांगण्यात आले. बहुतेकांनी त्याचे समर्थन केले.

एलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. आता युजर्स 10 हजार अक्षरांचे ट्विट करू शकतात. मात्र, आतापर्यंत ही सुविधा फक्त ट्विटर ब्लू सदस्यांसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर आता यूजर्स इमोजीच्या माध्यमातून डायरेक्ट मेसेजला रिप्लाय देखील करू शकतात.