Twitter Logo Changed: ट्विटरचे मालकी हक्क जेव्हापासून एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे आले आहे तेव्हापासून त्यांने ट्विटरमध्ये (Twitter) मोठे बदलाव केले आहे. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे तर अनेकांनी या निर्णयाविरोधात नाराजी देखील व्यक्त केली आहे. आता एलॉन मस्कने ट्विटरचा लोगो बदलला आहे. आता प्रसिद्ध निळ्या चिमणीऐवजी श्वानाचा लोगो (Dog Logo) ट्विटरसाठी वापरण्यात आला आहे. हा बदल पाहून अनेक वापरकर्त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी यावर आश्चर्य देखील व्यक्त केले आहे.
पहा ट्विट -
— Elon Musk (@elonmusk) April 3, 2023
आज सकाळी सकाळी जेव्हा अनेकांनी ट्विटर सुरु केले तेव्हा त्यांना आपल्या ट्विटरच्या अकाऊंटवर श्वानाचा फोटो पाहून आपले ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यासारखे वाटले. नंतर स्वतः एलॉन मस्क यांनीच ट्विट करत माहिती दिल्याने हा संभ्रम संपला. एलॉन मस्कने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक मीम शेअर करत या निर्णयाची माहिती दिली आहे. यात श्वान कारच्या चालकाच्या जागेवर बसलेलं आहे आणि ते वाहतूक पोलिसांना आपलं ओळखपत्र दाखवत आहे. या ओळखपत्रात निळ्या चिमणीचा फोटो आहे. त्यावर हे श्वान वाहतूक पोलिसांना हा आपला जुना फोटो असल्याचं सांगत आहे.