जगातील सर्वात स्वस्त किंमतीचा TV, एवढी आहे किंमत आणि खासियत!
डीटेल टीव्ही कंपनी ( फोटो सौजन्य - फेसबुक )

तंत्रज्ञानाच्या दुनियेत दररोज नव नवे प्रयोग केले जातात. त्यामुळे सुधारत्या तंत्रज्ञानाचा देशातील नागरिकांना आजच्या काळाच्या गरजेच्या वस्तू सहज उपलब्ध होतात. म्हणूनच डीटेल( DETEL) या एका इलेक्ट्रॉनिक कंपनीने त्यांचा सर्वात कमी किंमतीचा टीव्ही बाजारात विकण्यास आणला आहे. तर या टीव्हीची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे.

देशातील एलसीडी टीव्हीच्या (LCD TV)  मॉडेलपैकी डीटेल कंपनीचा सर्वात कमी किंमतीचा टीव्ही असल्याचा दावा या कंपनीकडून केला जात आहे. तर टीव्हीची किंमत 4,999 असून तो सध्या 3,999 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तसेच 19 इंच असलेला हा टीव्ही B2BAdda.com या संकेतस्थळावरुन खरेदी करता येणार आहे. या D1 टीव्हीचे रेजॉल्यूशन 1366X786 पिक्सल असून इमेज क्वॉलिटी उत्तम असल्याचे या टीव्ही कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

या डीटेल कंपनीने आतापर्यंत सात एलईडी (LED TV) आणि स्मार्ट टीव्ही (Smart TV)  ग्राहकांसाठी आणले आहे. तर या एलसीडी टीव्हीच्या कनेक्टिव्हिटीसाठी 1HDMI आणि 1USB पोर्ट देण्यात आले आहे. मात्र स्पीकर्सचा आवाज हा उत्तम दर्जाचे ऑडिओ देतो असे कंपनीने सांगितले आहे.