मोबाईल पेमेंट सेवेसाठी सध्या गुगल कंपनीने Google Pay नावाचे नवीन अॅप सुरु केले आहे. मात्र गुगल पे अॅपवरुन दिल्ली उच्च न्यायालयाने आरबीआयला (RBI) सुनावले आहे.तसेच गुगल पे माध्यमातून अधिकृत पेमेंट सेवा सुरु नसूनही आर्थिक व्यवहार कसे केले जातात याबद्दल विचारले असून गुगल पे आणि आरबीआय यांना नोटीस पाठवली आहे.
गुगल पे विरुद्ध अभिजित मिश्रा नावाच्या व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा प्रश्न मांडला आहे. तर गुगल पे यांनी आरबीआयची परवानगी न घेता पेमेंट सेवा अवैधपणे पुरवली जात असल्याचे म्हटले आहे. या प्रकारामुळे पेमेंट्स अॅंन्ड सेटलमेंट यांचा भंग झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.(हेही वाचा-गुगल कंपनी Google Play Artist Hub ही सेवा येत्या 30 एप्रिल पासून बंद करणार)
20 मार्च रोजी आरबीआयने जाहीर केलेल्या अधिकृत पेमेंट सेवा पुरवणाऱ्या सूचीमध्ये गुगल पे यांच्या नावाचा समावेश नसल्याचे म्हटले होते. तरीही सध्या अनधिकृतपणे ही पेमेंट सेवा सुरु असल्याने आरबीआयला उच्च न्यायालयाने खडसावले आहे.