गुगल कंपनी Google Play Artist Hub ही सेवा येत्या 30 एप्रिल पासून बंद करणार
Google Play Music (Photo Credits- Twitter)

गुगल (Google) येत्या 30 एप्रिल पासून त्यांची Google Play Artiest Hub ही सेवा बंद करणार आहे. या अॅपच्या माध्यमातून एखाद्या आवडत्या गायकाची गाणी ऐकण्याची सेवा गुगलकडून दिली जात होती. परंतु ज्या युजर्संनी या अॅपवर त्यांची गाणी, व्हिडिओ अपलोड केले आहेत त्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत रिपोर्ट तयार करुन पैसे देण्यात येणार आहेत. तसेच 1 जुलैपासून प्ले स्टोरवरुन सुद्धा ही सेवा हटवण्यात येणार आहे.

2012 रोजी गुगलने प्ले आर्टिस्ट हब ही सेवा सुरु केली होती. त्यामध्ये आपल्या आवडत्या कलाकाराची गाणी ऐकण्याची संधी युजर्सला अॅप सबस्क्राईब केल्यावर मिळत होती, मात्र आता Youtube Music मुळे गुगल ही सेवा बंद करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्ले आर्टिस्ट हबची जागा लवकरच युट्युब म्युझिक घेणार आहे. यामुळे युजर्समध्ये नाराजी दिसून येत आहे.(हेही वाचा-Google ने भारतात लॉन्च केल्या YouTube Music आणि YouTube Premium या नव्या सुविधा; आता जाहीरातींशिवाय घ्या गाण्यांचा आनंद)

तसेच काही दिवसांपू्र्वी गुगलने Google Pluse आणि Inbox by Gmail ही सेवा बंद केली होती. त्यानंतर आता प्ले आर्टिस्ट हबची सेवा बंद करत असल्याने 30 एप्रिल नंतर युजर्सला या अॅपवर कोणत्याही प्रकारे गाणी अथवा व्हिडिओ अपलोड करता येणार नाही आहे.