ATM कार्ड नसतानाही काढता येणार पैसे? ICICI, SBI बॅंकेच्या ग्राहकांसाठी नवी सुविधा

भारतीय स्टेट बॅंक (State Bank Of India) आणि आयसीआयसीआय (ICICI) बॅंकेने नवी सुविधा आणली असून आता ग्राहकांना एटीएएम कार्ड ( ATM) नसतानाही पैसे काढता येणार आहे. यानंतर ग्राहक बॅंकेच्या निवडक एटीएमकार्डमधून पैसे काढू शकणार आहेत. एसबीआय ग्राहकांना योनो अॅपच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढणे शक्य होणार आहे. तसेच आयसीआयसीआय बॅंकेनेही आपल्या ग्राहकांना विना एटीएमकार्ड पैसे काढण्याची सुविधा सुरु केली आहे. सध्या जगात डिजिटल पद्धतीच्या व्यवहार अधिक गती प्राप्त झाल्याचे समोर येत आहे. तसेच अनेकजण ऑनलाईन पद्धतीचा व्यवहार करायला पसंती दर्शवत आहे. सुरुवातीला ऑनलाईन व्यवहार करताना लोकांच्या मनात वेगळीच शंका निर्माण होत होती. मात्र, आता अनेकांचा यावर विश्वास बसला आहे. हे देखील वाचा-कुरियर ट्रॅक करणे पडू शकते महागात, हॅकर्स खोटे SMS आणि E-Mail पाठवून करतायत पैशांची फसवणूक

एसबीआयच्या ग्राहकांसाठी माहिती-

एसबीआयच्या ग्राहकांना आपल्या मोबाईलमध्ये योनो अॅप डाउनलोड करून त्याच लॉगइन करणे आवश्यक आहे. तसेच ग्राहकाला लॉगइन केल्यानंतर योनो अॅपमध्ये 6 डिजीट क्रमांकाचा MPIN सेट करणे गरजेचे आहे. त्यानंतर ग्राहकाला योनो कॅशवर क्लिक करून एटीएम सेक्शनमध्ये जाऊन रक्कम टाकावी लागेल. त्यावेळी एसबीआय ग्राहकाच्या मोबाईल क्रमांकावर योनो कॅश ट्रान्झेक्शन नंबर पाठणार. हा नंबर टाकून ग्राहक त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकतात. महत्वाचे म्हणजे, पैसे काढताना ग्राहकाला आपल्या एटीएम पासवर्ड माहिती असणे गरजेचे आहे. तसेच हा नंबर 4 तासांसाठी मर्यादित राहणार आहे. एसबीआयच्या एटीएमच्या मुख्यपृष्ठावर ग्राहकाला विना एटीएमकार्ड व्यवहाराचा पर्याय निवडावा लागेल, त्यानंतर योनो कॅश आणि उर्वरित माहिती द्यावी लागणार आहे. यानंतरच ग्राहक एटीएममधून पैसे काढू शकतात. यातून ग्राहक केवळ 500 रूपयापासून तर, 10 हजार रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात.

आयसीआयसीआय ग्राहकांसाठी माहिती-

आयसीआयसी बॅंकेनेही आपल्या ग्राहकांसाठी विना एटीएमकार्ड व्यवहार ही सुविधा सुरु केली आहे. आयसीआयसीने आपल्या ग्राहकांना या सुविधाचा लाभ घेण्यासाठी आय मोबाईल नावाचे नवे अॅपची सुरवात केली आहे. याच्या माध्यमातून आयसीआयसीआयचे ग्राहक 15 हजार रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात. आयसीआयसीच्या ग्राहकाला या सुविधाचा लाभ घेण्यासाठी आय मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर 'आयमोबाईल' अ‍ॅपवर लॉग इन करा आणि 'सेवा' आणि 'आयसीआयसीआय बँक एटीएमवर रोख पैसे काढणे' हा पर्याय निवडा. ग्राहकाने इच्छित रक्कम प्रविष्ट करा, खाते क्रमांक निवडा आणि 4-अंकी तात्पुरता पिन तयार करुन सबमिट करा. त्यावेळी ग्राहकाला त्वरित एक संदर्भ ओटीपी मिळेल.आयसीआयसीआय बँकेच्या कोणत्याही एटीएमवर जा आणि कार्डलेस कॅश पैसे काढणे पर्याय निवडा. पुढे मोबाइल नंबर प्रविष्ट करा आणि संदर्भ ओटीपी क्रमांकावर जा. आता आपला तात्पुरता पिन प्रविष्ट करा आणि आपण काढू इच्छित रक्कम प्रविष्ट करा.