BSNL New Plan: BSNL (Bharat Sanchar Nigam Limited) आजही ब्रॉडबँड क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये आहे. यामुळेच कंपनी आता सतत नवनवीन योजना आणत असते. आता कंपनीने आपल्या यूजर्ससाठी फायबर बेसिक (Fiber Basic) नावाने एक नवीन प्लान लॉन्च केला आहे. या प्लानची किंमत 499 रुपये आहे. कंपनी या योजनेद्वारे कमी किमतीत फायबर इंटरनेट सेवा पुरवणार आहे.
बीएसएनएल फायबर बेसिक प्लॅन -
BSNL ची स्वतःची ही अमर्यादित इंटरनेट योजना आहे. कंपनी या प्लॅनमध्ये 40 Mbps च्या वेगाने FUP (Fair Usage Policy) अंतर्गत 3300 GB डेटा देईल. डेटा कोटा संपल्यानंतर प्लॅनचा 40 Mbps स्पीड 4 Mbps पर्यंत खाली येईल. या प्लॅनमध्ये लँडलाईनद्वारे अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. (हेही वाचा - Twitter Lays Off: ट्विटरने भारतातील 90% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढले- Reports)
ऑफर -
BSNL दिल्ली आणि मुंबई वगळता संपूर्ण भारतात आपली सेवा प्रदान करते, त्यामुळे हा प्लॅन देशाच्या इतर सर्व भागांमध्ये उपलब्ध असेल. कंपनी ग्राहकांना लॉन्च ऑफर देखील देत आहे, ज्यामध्ये वापरकर्ते पहिल्या महिन्याच्या बिलावर 90 टक्के पर्यंत सूट मिळवू शकतात.
BSNL Fiber Basic NEO Plan-
BSNL Fiber Basic NEO हा नवीन प्लॅन नाही, तर कंपनीने आपल्या जुन्या प्लॅनपैकी एकाचे नाव बदलले आहे, ज्याचे नाव आधी Fiber Basic होते. BSNL फायबर बेसिक NEO प्लॅनची किंमत 449 रुपये आहे. कंपनीने फक्त प्लॅनचे नाव बदलले आहे, प्लानची सर्व वैशिष्ट्ये आणि किंमत बदललेली नाही.
दरम्यान, कंपनी या प्लॅनमध्ये 3300 GB FUP डेटासह अमर्यादित इंटरनेट देखील देते. पण या प्लॅनमध्ये स्पीड 30 Mbps आहे आणि हा दोन्ही प्लानमधला फरक आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉलिंग देखील उपलब्ध आहे.