Representational Image (Photo Credit: Trak)

व्हॉट्सअॅप युजर्सचे देशभरातून करोडोच्या संख्येने युजर्स आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅपकडून नेहमीच त्यांच्या युजर्सला खुश ठेवण्यासाठी बदलत्या ट्रेन्डनुसार अपडेट आणि फिचर्स उपलब्ध करुन दिले जातात. मात्र व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक मोठी आणि वाईट बातमी आहे. कारण येत्या 31 डिसेंबर पासून काही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. व्हॉट्सअॅपने एक ब्लॉक लिहित असे म्हटले आहे की, विंडोच स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या युजर्सला नव्या वर्षात (2020) मध्ये व्हॉट्सअॅप त्यांना वापरता येणार नाही आहे.

यापूर्वी व्हॉट्सअॅपने याबाबत 1 जुलै पासून विंडोच स्मार्टफोनमध्ये या संबंधित अपडेट देणे बंद केले आहे. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने विंडोज स्मार्टफोन युजर्सला असे सांगितले की, जर तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय या अॅपचा वापर करायचा असल्यास नवा स्मार्टफोन खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबर पासून विंडोज स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप काम करणे बंद करणार आहे. तसेच कंपनीने याबाबत अधिक स्पष्टीकरण देत असे ही म्हटले होते की, त्यांचे लक्ष अशा स्मार्टफोनवर असते जे बहुतांश प्रमाणात युजर्सकडून वापरले जातात. WABetaInfo यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.(WhatsApp च्या माध्यमातून बँक खात्यामधील पैशांची चोरी होतेय, रहा सावध) 

Tweet:

व्हॉट्सअॅपने iOS युजर्ससाठी एक नवे बीटा अपडेट 2.20.10.23 आणले आहे. WABetaInfo यांच्या रिपोर्टनुसार, या बीटा अपडेट मध्ये सर्व फिचर्स अॅपलच्या अॅप स्टोअर मध्ये पुढील अधिकृत अपडेट उपलब्ध होणार आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप हॅप्टिक टच, लो डेटा मोड आणि कॉन्टॅक्ट इंटीग्रेशन सारखे फिचर्स घेऊन येण्याच्या तयारीत आहे.