इन्स्टाग्रामचा वापर करण्याअगोदर नव्या युजर्सना दयावी लागणार 'ही' माहिती
Instagram (PC -pixabay)

आता इन्स्टाग्रामवर (Instagram) नव्याने अकाऊंट सुरू करणाऱ्या युजर्सना (Instagram Users) त्याचे वय 13 वर्षे आहे, हे स्पष्ट करावे लागणार आहे. ज्या युजर्सचे वय 13 वर्षे असेल अशाच युजरला आता इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करता येणार आहे. त्यामुळे यापुढे तेरा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीला आपले इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करता येणार नाही. इन्स्टाग्रामने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

इन्स्टाग्रामवर नव्याने अकाऊंट सुरू करणाऱ्या व्यक्तीला ही माहिती मागवल्यामुळे लहान मुलांना इन्स्टाग्रामपासून दूर ठेवणे शक्य होईल. यामुळे लहान मुले अधिक सुरक्षित राहतील. तसेच यामुळे वयानुसार इतर युजर्सना इन्स्टाग्रामचा वापर करता येणं शक्य होईल. (हेही वाचा - Jio, Airtel आणि Vodafone-Idea या तिन्ही कंपन्यांचे जाणून घ्या सर्वात स्वस्त प्लॅन्स)

इन्स्टाग्रामने सुरू केलेला नव्या नियम लहान मुलांना इन्स्टाग्रामपासून दूर ठेवण्यास मदत करील. परंतु, युजरने आपल्या वयाबद्दल खोटी किंवा चुकीची माहिती दिली तर इन्स्टाग्राम कसे नियंत्रण ठेवणार? हे अद्याप अस्पष्ट आहे. अनेकदा काही व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करताना चुकीची माहिती भरतात. त्यामुळे इन्स्टाग्रामचा हा नवा नियम कितपत यशस्वी होईल हे सांगता येणं अशक्य आहे.