सध्या जगात तंत्रज्ञानाच्या बाबतील प्रगती करणारे दोनच देश अग्रस्थांनी आहेत, एक अमेरिका (America) आणि दुसरा चीन (China). अॅपल (Apple) ही सर्वात लोकप्रिय कंपनी अमेरिकेत आहेत. मात्र Apple ने आपल्या वस्तूंचे उत्पादन घेण्यासाठी अनेक देशांत प्लांट वसवले आहेत, यातील एक म्हणजे चीन. यामागे मुबलक कामगार, कमी दर, विपुल जागा अशी अनेक कारणे असतील. तंत्रज्ञान अमेरिकेचे मात्र ती उत्पादने बनत आहेत इतर देशांत, साहजिकच होणारा फायदाही अमेरिकेचाच आहे. मात्र आता एका स्क्रूमुळे अमेरिकेचे कोट्यावधीचे नुकसान होत आहे. तर मॅकबूक आणि कॉम्प्युटरसाठी लागणारे स्क्रू हे अमेरिकेत मुबलक प्रमाणात बनत नसल्याने ते चीनकडून मागवून घ्यावे लागत आहेत यामुळे चीनमध्ये हा नवा रोजगार उपलब्ध झाला आहे.
अमेरिकेत एवढे छोटे स्क्रू मिळत नसल्याने, किंवा मिळत असले तरी ते बनवण्याची गती फारच कमी असल्याने अॅपलला मॅकबूक आणि कॉम्प्युटर बनविण्याचा प्लांट चीनमध्ये हलवावा लागल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे. 2012 साली जेव्हा अॅपल आपले मॅक प्रो (Mac Pro) बाजारात घेऊन येणार होते तेव्हा त्यांना त्यासाठी काही ठराविक स्क्रूची गरज होती. ती अमेरिकेत मिळत नव्हती. ती तयार करून घेण्यासाठी येणार खर्च अवाढव्य होता आणि त्यामानाने दिवसागणिक मिळणाऱ्या स्क्रूची संख्याही कमी होती. त्यानंतर त्या कॉम्प्युटरच्या डिझाईनमध्ये थोडेफार बदल झाले. परत नव्या स्क्रूची गरज भासली, या वेळी अॅपलने चक्क ते चीनकडून मागवले. कारण चीनमध्ये हे स्क्रू मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत. अमेरिकेपेक्षा तिथल्या टीम्स मोठ्या आहेत, 24 तास तिथले उत्पादन चालते. त्यामामाने अमेरिकेमध्ये लोक घड्याळ्याच्या काट्यावर चालतात, म्हणून अॅपलला चीनकडून हे स्क्रू मागवणे परवडते. (हेही वाचा : Apple कंपनी लवकरच घेऊन येणार ट्रिपल कॅमेरा असलेला iPhone?)
या छोट्याशा स्क्रूमुळे अॅपलने 2017 मध्ये चीनला तब्बल 11 लाख कोटींचा व्यवसाय दिला. अमेरिकेमध्ये स्क्रू बनत नसल्याने काही महिने अॅपलने आयफोन आणि कॉम्प्युटरच्या विक्रीला थांबवावे लागले होते. मात्र हे स्क्रू चीनकडून अतिशय कमी किमतीमध्ये विकत मिळतात तसेच मिळणाऱ्या स्क्रूचे प्रमाण हे अमेरिकेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. दरम्यान अॅपलने त्यांची उत्पादने बनविण्यासाठी चीनमध्ये मोठमोठे कारखाने उघडले आहेत आणि लाखो लोकांना रोजगारही उपलब्ध केला आहे. आता यासाठी अॅपल भारतामध्येही त्यांचे प्लांट उभा करण्याच्या तयारीत आहे.