Battleground Mobile India Error: बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया जवळजवळ एका महिन्यापर्यंत बीटा मध्ये राहिल्यानंतर गेल्याच महिन्यात गुगल प्ले स्टोअरवर अॅन्ड्रॉइडसाठी उपलब्ध करुन दिला आहे. PUBG मोबाईल भारतीय संस्करण कथित रुपात आयओएससाठी जारी करण्यासाठी तयार आहे. मात्र आतापर्यंत iOS लॉन्चिंगसाठी कोणतीही विशिष्ट तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तर बॅटल रॉयल गेमचे स्टेबल वर्जन जाहीर केले आहे. गेमर्सला आता गेम खेळताना काही समस्या उद्भवत आहेत.
गेम खेळताना उद्भवणाऱ्या समस्यांमध्ये “server is busy, please try again later. Error code: restrict area” असे दाखवले जात आहे. जेव्हा गेम बीटा मध्ये होता तेव्हा सर्वर व्यस्ताचा खुप प्रॉब्लेम झाला होता. मात्र काही युजर्सला स्टेबल वर्जनमध्ये सुद्धा समस्यांचा सामना करावा लागत आहे. Error मेसेज गेमर्ससाठी गेम सुरु करण्यापासून सुद्धा थांबवू शकतो. अखेर यामागील काय कारण असेल किंवा ते फिक्स कसे करु शकता याबद्दल जाणून घ्या अधिक.(Global Internet Outage: Zomato, SonyLIV, Amazon यांसह अनेक अॅप्स आणि वेबसाईट्स डाऊन; जाणून घ्या काय आहे कारण)
जर तुम्ही भारताच्या बाहेरुन BGMI पर्यंत एक्सेस करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला सर्वस व्यस्त असल्याची समस्या येऊ शकते. बॅटलग्राउंड इंडिया गेम जसे नावावरुन कळते की अधिकृतरित्या भारतात उपलब्ध आहे. यासाठी कोणत्याही दुसऱ्या देशातील गेमला एक्सेस करण्याचा प्रयत्न केला असता तुम्हाला सर्वर व्यस्त असल्याची समस्या उद्भवू शकते.
BGMI वर सर्वर व्यस्त असल्याची समस्या उद्भवण्यामागील आणखी एक कारण असू शकते ते म्हणजे इंटरनेटचा स्पीड. गेम पर्यंत पोहचण्यासाठी तुमच्याकडे एक स्थिर WiFi कनेक्शन असावे लागते. अन्यथा समस्या येत राहिल. यासाठी जर तुम्ही BGMI वर समस्यांचा सामना करत असात तर प्रथम इंटरनेट कनेक्शन तपासून पहा.
यामागील आणखी एक कारण म्हणजे गेमचे साइडलोड वर्जन असण्याची शक्यता आहे. जर तुम्ही सुद्धा या समस्येचा सामना करत असाल तर फोन मधून अॅप अनइंस्टॉल करुन गुगल प्ले स्टोअरवर BGMI गेम पुन्हा इंस्टॉल करु शकता. लक्षात असू द्या की, गेम थर्ड पार्टी अॅप स्टोर किंवा APK आणि OBB फायल मधून डाऊनलोड करण्यासाठी वारंवार समस्या उद्भवू शकते.