Internet Connectivity (Photo Credits: Pixabay)

विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स अमेझॉन (Amazon), पेटीएम (Paytm), झोमॅटो (Zomato), सोनी लिव्ह (SonyLIV), हॉटस्टार (Hotstar) यांसारखे अॅप्स आज संध्याकाळपासून डाऊन झाले होते. तसंच जगभरातील विविध वेबसाईट्स देखील डाऊन झाल्या होत्या. त्यामुळे जगभरातील युजर्स त्रासले होते. परंतु, आता ही सेवा पुर्ववत झाली आहे. अकामाई टेक्नॉलोजीस (Akamai Technologies) ने देखील ट्विटद्वारे या समस्येची पुष्टी केली होती. अकामाई वेब इंफ्रास्ट्रक्टरमधील समस्येमुळे युजर्संना या त्रासाला सामोरे जावे लागले होते.

अकामाईने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "सेवेत व्यत्यय येत असल्याचा अनुभव आम्ही घेत आहे. आम्ही सक्रीयपणे समस्येचा मागोवा घेत आहोत आणि 30 मिनिटांत आम्ही तुम्हाला याबद्दल अपडेट देऊ." पुढे त्यांनी म्हटले की, "आम्ही समस्येचा तोगडा काढला असून सध्याची परिस्थिती पाहता सेवा पूर्ववत झाली आहे. आम्ही या परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेत राहू जेणेकरुन सेवा पूर्ववत झाल्याची शाश्वती मिळेल."

पहा ट्विट:

सेवेमध्ये आलेला हा व्यत्यय हा कोणत्याही प्रकारचा सायबर हल्ला नसल्याचे अकामाई टेक्नॉलॉजीसने स्पष्ट केले आहे. तसंच या संपूर्ण परिस्थितीचा सातत्याने आढावा घेणार असल्याचे सांगितले.

अमेरिकन एक्सप्रेस, एचएसबीसी बँक यांच्यासारखे आर्थिक संस्थांची साईट देखील बंद झाली होती. यासोबत ब्रिटिश एअरवेज, प्ले स्टेशन यांसारख्या वेबसाईट्स सुद्धा खूप हळूहळू लोड होत होत्या. डाऊन डिटेक्टर ने दिलेल्या माहितीनुसार, स्ट्रिम आणि पीएसएम, डिज्नी प्लस हॉटस्टार, झी5, झोमॅटो, अॅमेझॉन आणि पेटीएम यांसारख्या मोठ्या वेबसाईट्स देखील या व्यत्ययामुळे बंद पडल्या होत्या.