BSNL Best Validity Recharge Plan: BSNL ची जबरदस्त ऑफर; 150 दिवसांच्या वैधतेसह दररोज मिळणार 2GB डेटा आणि मोफत कॉलिंग
BSNL office. (Photo Credit: Wikimedia Commons)

BSNL Best Validity Recharge Plan: BSNL आपल्या ग्राहकांसाठी नव-नवीन रिचार्ज प्लान घेऊन येत असते. Jio आणि Airtel सोबत स्पर्धा करण्यासाठी कंपनी नवीन ऑफरसह योजना लाँच करत आहे. इतर दूरसंचार कंपन्यांप्रमाणे, BSNL चे देखील एक महिन्यापासून ते 365 दिवसांपर्यंतचे अनेक प्लॅन आहेत. तुम्ही BSN मध्ये दीर्घ वैधता योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी असा प्लान आणला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 150 दिवसांची दीर्घ वैधता मिळते.

बीएसएनएल पुन्हा एकदा टेलिकॉम क्षेत्रात पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कंपनी सतत नवीन रिचार्ज प्लॅन आणत असतानाच अनेक जुने प्लॅन देखील अपडेट करत आहे. कंपनी आपल्या योजनांसह इतर कंपन्यांना कठीण स्पर्धा देत आहे. कंपनीने ग्राहकांसाठी असा प्लान आणला आहे ज्यामध्ये अमर्यादित कॉलिंगसह 5 महिन्यांची दीर्घ वैधता देण्यात आली आहे. (हेही वाचा - Twitter New Logo: 'X' घेणार ट्वीटरच्या चिमणीची जागा; Twitter Headquarters वर Elon Musk यांनी दाखवला नवा लोगो)

बीएसएनएलच्या 397 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्संना अनलिमिटेड कॉलिंग सोबत लाँग व्हॅलिडिटी मिळते. या प्लॅनची ​​सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही तुमचे सिम कोणत्याही टेन्शनशिवाय 150 दिवस अॅक्टिव्ह ठेवू शकता. बीएसएनएलच्या या प्लॅनचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करतील.

BSNL च्या 397 रुपयांच्या प्लॅनचे फायदे -

BSNL च्या 397 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये तुम्ही फक्त 30 दिवसांसाठी अमर्यादित कॉल करू शकता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे सिम 150 दिवस अॅक्टिव्ह राहील. 30 दिवसांनंतरही तुम्ही रिचार्ज केले नाही, तरी इनकमिंग कॉल्स आणि मेसेज प्राप्त करण्याची सुविधा सुरू राहील.

397 रुपयांच्या प्लॅनसह, BSNL वापरकर्त्यांना 30 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा देखील प्रदान करते. दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर, तुम्ही 40Kbps च्या वेगाने डेटा वापरण्यास सक्षम असाल. BSNL 1 महिन्यासाठी दररोज 100 SMS ची सुविधा देखील प्रदान करते.