Apple Store | Twitter/ANI

Apple चं भारतामधील पहिलं वहिलं रिटेल स्टोअर आजपासून (18 एप्रिल) मुंबई मध्ये सुरू होत आहे. Bandra Kurla Complex च्या  Jio World Drive Mall मध्ये हे स्टोअर सुरू होत आहे. मुंबई पाठोपाठ दिल्ली मध्ये या आठवड्यात नवं स्टोअर सुरू होत आहे. Apple CEO Tim Cook देखील सध्या भारतामध्ये आले आहेत. काल त्यांनी कर्मचार्‍यांसोबतचा एक सेल्फी देखील पोस्ट केला आहे.

Apple BKC हे जगातील मोस्ट एनर्जी एफिशिएंट अ‍ॅपल स्टोअरपैकी एक म्हणून डिझाइन केले आहे, ज्यामध्ये solar array आणि स्टोअर ऑपरेशन्ससाठी जीवाश्म इंधनावर बिलकूल अवलंबून नाही. हे स्टोअर कार्बन न्यूट्रल आहे, 100 टक्के रिन्यूएबल एनर्जीवर अवलंबून आहे. नक्की वाचा: मुंबईमधील Apple च्या रिटेल स्टोअरजवळ Google, LG, Sony सारखे प्रतिस्पर्धी 22 ब्रँड्स आपले दुकान उघडू शकणार नाहीत, पहा यादी .

पहा ट्वीट

बीकेसीच्या अ‍ॅपल स्टोअर मध्ये आयफोन, मॅक, आयपॅड, एअरपॉड्स, अ‍ॅपल वॉच आणि अ‍ॅपल टीव्ही उपलब्ध असणार आहे. या स्टोअर मध्ये अ‍ॅपल पिकअप सेवा देखील उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ग्राहक ऑनलाईन ऑर्डर करून वस्तू स्टोअर मधून त्यांच्या वेळेनुसार पिकअप करू शकतील.

बीकेसीच्या स्टोअर मध्ये 100 जणांची टीम काम करत आहे. 20 पेक्षा अधिक भाषा बोलणारे कर्मचारी येथे आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार बाजारात उपलब्ध असलेले चांगले प्रोडक्ट्स उपलब्ध करून मिळणार आहेत.

रिपोर्ट्सनुसार, बीकेसी मधीलहे अ‍ॅपल स्टोअर सोमवारी बंद असेल. मंगळवार ते रविवार हे स्टोअर सकाळी 11 ते रात्री 10 दरम्यान सुरू राहणार आहे. भारतामध्ये 2017 पासून अ‍ॅपलच्या प्रोडक्ट्सची निर्मिती केली जात आहे.