Apple Support Website Down: अॅपल सपोर्ट वेबासईट डाऊन, जगभरातील युजर्स करतायत त्रुटींचा सामना
Apple (Apple / Twitter)

Apple सपोर्ट वेबसाइट जगभरातील अनेक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होत नसल्याचे पुढे आले आहे. अनेक लोकांनी साईटवर प्रवेश करताच त्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आलेल्या अडचणींनंतर अनेक युजर्सनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. अनेक युजर्सनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, जेव्हा आम्ही अॅपलच्या वेबसाईटवर जातो तेव्हा आम्हाला URL एरर दिसतो आहे. वृत्तसंस्था आयएनएसनेही याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, एका युजरने @Apple ला टॅग करत म्हटले आहे की, मी जेव्हा Apple वेबसाईटवर प्रवेश करत असताना URL त्रुटींचा सामना करावा लागतो आहे असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने @AppleMusic डाऊन आहे काय असे विचारले आहे. तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, @AppleSupport मला साईटवरुन कोणत्याही प्रकारची कृती करता येत नाही. साईटला नेमकं काय झालं आहे. (हेही वाचा, Apple Watch Saves Woman Life: नवऱ्याने संतापून पत्नीला जमिनीत जिवंत गाडलं; मग अॅपल वॉचने जे केलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही)

ट्विट

ट्विट

दरम्यान, ऑनलाइन आउटेज मॉनिटरिंग वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 43 टक्के ऍपल वापरकर्त्यांनी वेबसाइटवर प्रवेश करू शकत नसल्याचे म्हटले आहे. आयफोन वापरकर्ता असलेल्या सुमारे 39 टक्के लोकांनी बेवसाईट समस्यांचा सामना आहे. उर्वरित 18 टक्के लोकांनी Apple TV साठी त्रुटींचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले आहे. Apple Inc. कडे ‘सिस्टम स्टेटस’ नावाचे वेबपेज आहे जे क्लाउड सेवांसह कंपनीच्या अनेक ऑनलाइन सेवांची सद्यस्थिती दाखवते. हे वृत्त लिहीपर्यंत आमच्याकडे साईटबद्दल अधिक कोणतीही माहिती उपलब्ध झाली नव्हती.