Apple's 'Its Glotime' Event Today: iPhone बनवणारी अमेरिकी टेक कंपनी Apple आज सोमवारी 9 सप्टेंबर रोजी त्यांची नवीन iPhone 16 सीरीज लॉन्च करणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार ॲपल 'इट्स ग्लोटाइम' इवेंट का प्रश्न करेगी. इव्हेंट को ग्लोबली आज रात्री 10:30 वाजता लाइव्ह-स्ट्रीम होईल, Apple.com, Apple TV ॲप आणि त्यांच्या YouTube चॅनलवर लाइव्ह-स्ट्रिमींग पाहता येणार आहे. (हेही वाचा: Apple to Create Jobs in India: ॲपल भारतात निर्माण करणार 6 लाखांहून अधिक नोकऱ्या; 70 टक्क्यांहून अधिक असतील महिला कर्मचारी)
ॲपलने या मेगा टॅग इव्हेंटला ग्लोटाइम असं नाव दिलं आहे. या इव्हेंटमध्ये युजर्ससाठी नव्या घोषणा होणार आहेत. ॲपलने पहिल्यांदाच आपल्या आयफोनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI वापर करुन हे मॉडेल तयार केल्याची माहिती दिली आहे. याशिवाय ॲपलचा व्हॉईस असिस्टंट सिरी देखील अपग्रेड होण्याची शक्यता आहे. ॲपलच्या या नवीन सीरिजबद्दल अनेक दिवसांपासून लीक रिपोर्ट्स समोर येत होते. या सीरिजच्या चारही मॉडेल्सचे डमी समोर आले आहेत. आजच्या इव्हेंटमध्ये फोनचं डिझाइन आणि अपग्रेडबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
iPhone 16 आणि iPhone 16 Plus च्या कॅमेऱ्यात थोडाफार बदल करण्यात आला आहे. याशिवाय या दोन्ही फोनचे डिस्प्ले iPhone 15 आणि iPhone 15 Plus पेक्षा मोठे असणार आहेत. iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro च्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे दोन्ही फोन iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max सारखे किंवा थोडेफार बदल केलेले असतील.
Apple Apple Watch Series 10 आणि AirPods 4 देखील आज लॉन्च केले जाणार आहेत. या इव्हेंटमध्ये सॉफ्टवेअर अपडेटबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. ज्यात iOS 18, iPadOS 18, tvOS 18, watchOS 11, VisionOS 2 आणि macOS Sequoia या सॉफ्टवेअरचा समावेश असेल. याचे फायदे देखील युजर्सला समजवून सांगितले जातील.