धक्कादायक! iPhone सर्विस सेंटरकडून एका विद्यार्थिनीचे Nude फोटोज Facebook झाले लीक, Apple कंपनीला बसला कोट्यवधींचा भुर्दंड
MMS | (Photo credit: archived, edited, representative image)

कॅलिफोर्नियात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. आयफोन सर्विसकडून दुरुस्तीसाठी (iPhone Service Centre) आलेल्या एका विद्यार्थिनीच्या फोनमधील न्यूड फोटोज (Nude Photos) फेसबुक लीक झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर विद्यार्थिनीने हे प्रकरण कोर्टात नेलं. 2016 मध्ये घडलेल्या प्रकरणावर निकाल लागत हा निकाल विद्यार्थिनीच्या बाजूने लागला आहे. ज्यात Apple कंपनीला त्या विद्यार्थिनीला कोट्यवधी रुपये मोजावे लागले आहेत. अब्रु नुकसानी म्हणून या कंपनीला कोट्यवधींचा भुर्दंड बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनीचा आयफोन सर्विस सेंटरकडे 2016 मध्ये दुरुस्तीसाठी आला होता. त्यावेळी तिच्या मोबाईलमधील तिचे न्यूड फोटोज आणि व्हिडिओज सर्विस सेंटरच्या एका टेक्निशियने गोपनीय पद्धतीने फेसबुकवर लीक केले. त्याने तिचे 10 नग्न फोटोज आणि एक व्हिडिओ तिच्याच फेसबुक अकाउंवरुन पोस्ट केले होते. तसेच हे फोटोज आणि व्हिडिओ तिनेच पोस्ट केल्याचे भासवले. मात्र मित्र आणि नातेवाईकांनी ही गोष्ट लक्षात आणताच तात्काळ तिने ते फोटोज डिलीट केले. त्यानंतर तिने अब्रुनुकसानीचा दावा ठोकला.हेदेखील वाचा- Sky Pool Viral Video: जमिनीपासून 115 फूट उंच हवेत आहे हे स्विमिंग पूल, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

सदर घटनेची माहिती मिळताच अॅप्पल कंपनीने दोन्ही कर्मचा-यांना कामावरून काढून टाकले. मात्र 2016 पासून सुरु असलेल्या प्रकरणाचा निकाल लागला असून हा निकाल त्या मुलीच्या बाजूने लागला आहे. ज्यामुळे कंपनीला मुलीला कोट्यवधी रुपये मोजावे लागले आहेत. द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीच्या वकिलाने कंपनीकडून पाच मिलियन डॉलर्सची मागणी केली होती.